devendra.jpg 
मुंबई

'मुख्यमंत्री ज्या घराण्यातून येतात, त्याचा त्यांनी मान राखावा, अन्यथा...'

दीनानाथ परब

"सचिन वाझे प्रकरण त्यानंतर अनिल देशमुख या सर्व विषयात उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नाही. मुख्यमंत्र्यांनी आधी सचिन वाझेचं समर्थन केलं. त्यानंतर सचिन वाझेला अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकही स्टेटमेंट दिलेली नाही. इतके गंभीर विषय झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच मौन आश्चर्यचकीत करणारं आहे" अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

"मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा मान राखत, ज्या घराण्यातून येतात, त्याचा मान राखत कारवाई करावी, नाहीतर लोक त्यांच्याकडे सुद्धा संशयाने पाहतील" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

"महाराष्ट्राच पोलीस दल देशातल सर्वोत्तम आणि मुंबई पोलीस दल जगात सर्वोत्तम आहे. पण या सरकारच्या कार्यकाळात पोलीस दलाचं मोठं खच्चीकरण झालं" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. "महाराष्ट्रात दुर्देवाने कोरोनाची लाट वेगाने पसरतेय. काल ५७ हजार केसेसेची नोंदणी झाली. आज ४५ ते ४६ हजार कोरोनाबाधितांची नोंद होऊ शकते. लोकांना बेडस, ऑक्सिजन मिळत नाहीय. प्रसार होत असताना व्यवस्था उभ करणं महत्त्वाचं आहे.  आपण सर्व मिळून कोरोनाच्या लाटेचा मुकाबला करुया.  भाजपाचा कार्यकर्ता लसीकरण मोहिमेत अग्रणी राहिलं" असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत...
"मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो. निदान या निर्णयानंतर अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे" अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते घाटकोपरमध्ये भाजपा आमदार पराग शाह यांनी उभारलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरच्या कार्यक्रमात बोलत होते. 

"अनिल देशमुख गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत नसतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर एखाद्या मंत्र्याच्या विरुद्ध न्यायालयााने सीबीआय चौकशी सांगितल्यानंतर त्यांनी त्या पदावर राहण अयोग्य आहे" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत मोठा निर्णय ! शेल्टर होममध्ये ठेवता येणार नाही, नसबंदी हाच योग्य उपाय

AUS vs SA 2nd ODI: १९८७ नंतर वन डेत चमत्कार! भारताच्या दिग्गजानंतर 'हा' पराक्रम करणारा मॅथ्यू ब्रित्झके दुसराच फलंदाज ठरला

"आई अचानक आम्हाला सोडून गेली आणि.." ज्योती चांदेकरांच्या लेकीची आईच्या आठवणीत भावूक पोस्ट

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Raisin Trader Fraud : पन्नास लाख रुपयांऐवजी कोऱ्या कागदांचे दिले बंडल, बेदाणा व्यापाऱ्याकडून दिल्लीतून साथीदारांनी उचलली रक्कम

SCROLL FOR NEXT