मुंबई

कोत्या मनाने विरोध करू नये, मुनगंटीवारांचं राऊतांना प्रत्त्युत्तर

सकाळ वृत्तसेवा

Narayan Rane Jan Ashirwad Yatra : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा आजपासून सुरू होणार आहे. दादर येथील शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन राणे यात्रेला सुरुवात करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नारायण राणे यांना नाही, असे टीकास्त्र शिवसेना खासदार विनायक राऊत सोडलं होतं. यावर आता भाजपमधून प्रतिक्रिया आली आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विनायक राऊत यांना त्त्युत्तर देत कोत्या मनाने विरोध करू नये असं म्हटंल आहे.

'छोटे दिल से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई खडा नही होता', असा टोला मुनगंटीवर यांनी राऊत यांना लगावला. एबीपी माझाशी बोलताना मुनगंटीवार यांनी विनायक राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्त्युत्तर दिलं. ते म्हणाले की, 'केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या जागेवर येऊन आशिर्वाद घेत असतील तर कोत्या मनाने आम्ही येऊ देणार नाही, असा विरोध करु नये. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ही काही एखाद्या कंपनीची शेअर्स इक्विटी नाहीये. त्यांचं दर्शन कुणीही घेऊ शकते. '

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला लागून मनं कोती झाली -

स्व.बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत, हिंदूहृदयसम्राट आहेत. त्यांचे स्मारक हे "शिवतीर्थ" आहे आणि कोणीही त्याचे दर्शन घेऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून आता तुमची मनं कोती आणि छोटी झाली आहेत. राजकारणात मतभेद असतातच. जसे ते राज ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये होते, नारायणराव राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होते. पण यांच्यामध्ये मतभेद असले तरी मनभेद नव्हते हे आजवर अनेकदा स्पष्ट झालं आहे. शिवतीर्थाला भेट ठरवत नारायणराव राणेंनीही बाळासाहेबांप्रतीचा आदर आणि आपल्या नेक दिलाचे दर्शन घडवले आहे. राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादासाठीच असावे, महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठीच्या बाष्कळ बोलघेवडेपणाचे नसावे असा सणसणीत टोला प्रमोद जठार यांनी विनायक राऊतांना लगावला आहे.

वातावरणात तापण्याची चिन्हे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात आजपासून (ता. १९) शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देवून करत भाजपने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा इशारा दिल्याने उद्या दादर येथे वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असल्याने शिवाजी पार्क पोलिस ठाण्याने सुरक्षेची व्यवस्था केली आहे. महापालिका निवडणुकीची सूत्रे नारायण राणे यांच्याकडे सोपवल्याने या यात्रेला विशेष महत्त्व आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

SCROLL FOR NEXT