पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी
पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी 
मुंबई

ठाण्यात पेट्रोल पंपावर महिलाराज 

दीपक शेलार

ठाणे : देशातील समाजसुधारकांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिल्यानंतर समाजातील चित्र बरेचसे बदलले आहे. मागील काही वर्षांत स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खूप मोठी मजल मारत असून एकप्रकारे पुरुषी सरंजामशाहीला तोडीस तोड उत्तर देत आहेत; मात्र केवळ "महिला दिन' साजरे करण्यापेक्षा महिला सक्षमीकरणाच्या हेतूने ठाण्यातील एका पेट्रोल पंप मालकाने तब्बल 15 महिला कर्मचाऱ्यांना पंपावर नोकरी देऊन रोजगाराचा प्रश्‍न सोडवला आहे. त्यामुळे एकप्रकारे पेट्रोल पंपावरही "महिला राज' अवतरल्याचे पाहावयास मिळत आहे. 

सर्वच क्षेत्रांत महिलांना 50 टक्के आरक्षण असले, तरी अनेक जिकिरीच्या कामांमध्ये आजवर महिला कर्मचारी जाताना दिसत नव्हत्या. आता प्रत्येक क्षेत्रात महिला आपले काम करीत कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. वैमानिकापासून ते रेल्वे, बस, एसटी, रिक्षा चालवताना महिलांना आपण सर्वांनी पाहिले आहे;

मात्र आता ठाण्यात आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठीदेखील महिला दिसत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर ठाण्यातील माजिवडा येथील सर्वांत मोठा दिवस-रात्र सुरू असणारा युनिव्हर्सल सर्व्हिस सेंटर पेट्रोल पंप आहे. या पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी चक्क महिलावर्ग नेमण्यात आल्याने वाहन चालकांकडून या कष्टकरी महिलांचे कौतुक केले जात आहे. 

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅस पुरवठा करणारा हा पेट्रोल पंप रात्रंदिवस सुरू असल्याने इंधन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची या पंपावर रीघ लागलेली असते. या पंपावर दिवस पाळीसाठी दोन शिफ्टमध्ये नियुक्त केलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना उत्तम सेवा दिली जाते.

तेव्हा इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांसोबत अनेकदा क्षुल्लक गोष्टीतून उद्‌भवणारे वाद होण्याचे प्रमाणदेखील घटले असून महिला कर्मचारी व्यसनापासून अलिप्त असल्याने त्याचाही फायदा ग्राहकांना सेवा देताना होत आहे, असा दावा पंप संचालकांनी केला. 

गेली 35 वर्षे या व्यवसायात असून समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो, याच उद्देशाने महिला सक्षमीकरणासाठी हे पाऊल उचलले आहे. 15 महिलांना पेट्रोल पंपावर रोजगार मिळवून दिला आहे. पुरुष कामगारांप्रमाणेच महिलांना मोबदला दिला जात असून वेतन ऑनलाईन खात्यामध्ये वर्ग केले जाते. आणखी महिला कर्मचारी नेमण्यासह भविष्यात केवळ महिला कर्मचारी असणारा पेट्रोल पंप सुरू करण्याचा मानस आहे. 
- विजयकुमार सावला, पेट्रोल पंप मालक 

महानगर गॅस कंपनीच्या वतीने पूर्वी याच पेट्रोल पंपावर माझे पती ऑपरेटर म्हणून नोकरी करत होते. दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाल्याने कुटुंबाची आबाळ होत होती. सावला यांनी मदतीचा हात देऊन सर्वप्रथम माझी नियुक्ती करून पंपावर "महिला राज'चा श्रीगणेशा केला. पंपावरील अधिकारी-कर्मचारी किंबहुना इथे येणारे वाहनचालकही महिलांचा सन्मान करीत असल्याने खऱ्या अर्थाने आम्ही महिला सक्षम बनलो आहोत. 
- माधवी घोवळकर, महिला कर्मचारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT