अलिबाग : लग्नाचा वऱ्हाड घेऊन येणारा टेम्पो पोलादपुर तालुक्यातील कुडपण येथे खोल दरीत कोसलून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. ही घटना सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान झाली असल्याची प्राथमिक माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून लग्नाचा वऱ्हाड घेऊन अपघातग्रस्त टेम्पो पोलादपुर तालुक्यातील कुडपण येथे येत होता. याच वेळेस रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पोचालकाचा ताबा सुटला. या टेम्पोमध्ये पंचवीसहुन अधिक वऱ्हाडी होते. काळोख असल्याने खोल दरीतून जखमींना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. घटणेची माहिती स्थानिकांनी पोलादपुर पोलिस ठाण्याला देताच पोलादपुर पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून घटनास्थळी घाव घेतली आहे
( बातमी अपडेट होत आहे )
--------------
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.