Dombivli MIDC Blast 
मुंबई

Dombivli MIDC Blast: डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट, तीन जणांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जण जखमी

Dombivli MIDC explosion in a company: स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण आहे. आकाशामध्ये धुराचे लोट पसरले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एमआयडीसी फेज दोनमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय. स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण आहे. आकाशामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. स्फोटामुळे मोठा हादरा बसला होता. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

डोंबिवलीतील एमआयडीसीत केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या भीषण स्फोटाची भीषणता इतकी होती की आसपासच्या २- ३ किलोमीटरपर्यंत इमारतींना हादरे बसले आहेत. परिसरात धुराचे लोट पसरले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची दाहकता प्रचंड असल्याने आसपासच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाला आहे.

तर या भीषण आगीमध्ये तीन मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती आहे.

घराच्या काचा देखील फुटल्या

अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना एम्स रुग्णालयात हलवले जात आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग सिलेंडरची आहे की इतर कशाची याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण, बॉयलर स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग इतर कंपन्यांमध्ये पसरली आहे. अद्याप जीवितहानीची माहिती नाही. पण, अनेकजण जखमी झाले आहेत. लोकांच्या घराच्या काचा फुटल्या आहेत. यामुळे २५ ते ३० नागरिक जखमी झाल्याचं कळतंय.

आग इतर कंपन्यांमध्ये पसरली

दुपारी दीडच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सदर कंपनी केमिकलची असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. तूर्तास आग विझवणे शक्य होत नाहीये. आग वाढतच आहे. आजूबाजूच्या कंपनीमध्ये आग पसरत चालल्याची माहिती आहे. अधिकच्या अग्निशमन दलाच्या गाड्या इतर भागातून मागवल्या जात आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

आमचं कार्यालय ज्या कंपनीत स्फोट झाला तिथून अर्ध्या किलोमीटरवर आहे.  दुपारी कामासाठी मी बाहेर गेलो होतो. पावणे दोनच्या सुमारास ऑफिसला परतलो आणि अवघ्या काही क्षणात जोरदर आवाज आला. आमची पूर्ण बिल्डिंग या आवाजाने हादरली. आम्ही पळत बाहेर आलो तर समोर धूर, आगीचा भडका दिसत होता. स्फोटांचे आवाज येत होते.
दिनेश चव्हाण, व्यावसायिक

जखमींमध्ये महिला, मुलांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमध्ये पाच ते सहा कामगार जखमी झाले आहेत. परिसरातील काही लोक देखील जखमी झाले आहेत. यात महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. यावरुन स्फोटाची तीव्रता समजून येईल. धुरामुळे आकाश झाकोळले आहे. म्हात्रे पाडा, सोनार पाडा या भागांना जास्त फटका बसला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अशाच प्रकारे एमआयडीसीमधील एका कंपनीत स्फोट झाला होता. सदरच्या घटनेमुळे त्याची आठवण काढली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत विविध विषयावरील देखावे

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT