MP Shrikant Shinde sakal
मुंबई

Malang Gad : येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता पुन्हा खासदार शिंदे यांनी मलंगमुक्ती संदर्भात वारकऱ्यांना आश्वासन दिले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कोणीच विचार केला नव्हता,आज राममंदीर उभे राहत आहे. येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील आपले मुख्यमंत्री मिळवून देतील असे आश्वासन मी या ठिकाणी देतो असे विधान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण उसाटणे येथील मलंगगड हरीनाम उत्सवाच्या सांगता समारोह प्रसंगी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता पुन्हा खासदार शिंदे यांनी मलंगमुक्ती संदर्भात वारकऱ्यांना आश्वासन दिले आहे. कल्याणच्या मलंगगड परिसरातील उसाटणे येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.

आज सप्तहाचा शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमानिमित्त खासदार डॉ.शिंदे यांनी भाषणात मलंगगड मुक्ती संदर्भात विधान करत सांगितले की आपल्या सर्वाच्या मनामध्ये जी भावना आहे. ती मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविली आहे. त्याच्यावर काम देखील सुरु आहे. येणाऱ्या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल हे या ठिकाणी मी खात्रीलायक सांगू शकतो.

अफजल खानाचा कोथळा दोन वेळा काढण्यात आला. पहिला कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता. तर प्रताप गडावरील अतिक्रमण या सरकारने काढत दुसऱ्यांदा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आहे.

हे जे काम आहे धर्माचे काम आहे. येणारी पिढी ही चळवळ पुढे नेणार आहे. देशात राम मंदिर उभे राहत आहे. त्याचप्रमाणे या मलंगगडाला मुक्ती देखील आपले मुख्यमंत्री मिळवून देतील असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT