mumbai sakal
मुंबई

मुंबई : मलेरियाचे दोन हजारांवर रुग्णवाढ; त्यापाठोपाठ गॅस्ट्रो आणि हेपेटायटिसचे रुग्ण वाढ

शहरात कोरोना नियंत्रणात आला असला तरी पावसाळी आजार वेगाने पसरत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शहरात कोरोना (Corona) नियंत्रणात आला असला तरी पावसाळी आजार वेगाने पसरत आहेत. मुंबईत (Mumbai) सध्या मलेरियाने (maleria) जोर धरला आहे. मलेरियाचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ गॅस्ट्रो (Gastro) आणि हेपेटायटिसचे (hepatitis) रुग्णही वाढत आहेत.

मलेरियाचे गेल्या सात महिन्यांपासून मुंबईत २१४६ रुग्ण सापडले आहेत. १८ जुलैपर्यंत मुंबईत ३८५ मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात एकूण ९५४ रुग्ण सापडले होते; मात्र आतापर्यंत मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे जी दक्षिण, ई, एफ दक्षिण आणि जी उत्तर या वॉर्डमध्ये सध्या सापडत आहेत. गॅस्ट्रो आणि हेपेटायटीस रुग्णही वाढत असून, गॅस्ट्रोच्या १४३२ रुग्णांची नोंद झाली आहे. हेपेटायटीसचे १०८ रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

  • लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण दुप्पट

लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत या वर्षी दुप्पट नोंदले गेले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये १४ रुग्णांची नोंद झाली होती; पण यंदा २६ रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. सात महिन्यांत आतापर्यंत ८५ रुग्णांची नोंद पालिकेने केली आहे.

  • स्वाईन फ्लूचे रुग्ण जास्त

या वर्षीच्या जुलैमध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १५ रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण सापडला नव्हता. या वर्षी जुलैपर्यंत एकूण २२ रुग्णांची नोंद झाली. स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईतील डी, जी दक्षिण, के पूर्व, के पश्चिम, पी. एस आणि टी वॉर्डमध्ये सापडले आहेत. म्हणजेच आतापर्यंत या वॉर्डमधून सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मान्सून संबंधित रुग्ण पूर्वीपेक्षा १० ते २० टक्के वाढले आहेत. मान्सून संबंधित आजारांमध्ये डेंगी, व्हिवॅक्स मलेरिया, फाल्सीपेरम मलेरिया हे आजार आहेत. अनेक रुग्णांना स्वाईन फ्लूचा संसर्गही झाला आहे. कोविड आणि नॉन-कोविड आजारांची लक्षणे सारखीच असल्याने उपचार करताना गफलत होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- डॉ. हरीश चाफले, वरिष्ठ सल्लागार, पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअर, ग्लोबल रुग्णालय

पावसाळी आजारांसाठी मुंबई पालिका सज्ज आहे. सर्व रुग्णालयांना खाटा आरक्षित ठेवण्यास सांगितले आहे.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT