Mamata Banerjee sakal
मुंबई

Mamata Banerjee : 'माझ्या हातात असतं तर...'; राखी बांधायला आलेल्या ममता दीदींनी 'महानायका'साठी केलं 'हे' आवाहन

दत्ता लवांडे

मुंबई : देशातील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्याच्या बैठकीसाठी हजर झाल्या असून त्यांनी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांना राखी बांधून कोलकत्त्याला येण्याचेही निमंत्रण दिले आहे.

आमच्या यावेळी बऱ्याच गप्पा झाल्या. अमिताभ यांनी कोलकत्ता येथे आपल्या जीवनाला सुरूवात केली. आज अमिताभ बच्चन हेच आमच्यासाठी भारतरत्न आहेत. माझ्या हातात असतं तर मी एका क्षणात त्यांना भारतरत्न दिला असता असं ममता बॅनर्जी बोलताना म्हणाल्या.

यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना कोलकत्ता येथे होणाऱ्या दुर्गा पुजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येण्यासाठी आमंत्रित केले आहे. बच्चन यांना भेटून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, इंडिया या विरोधकांच्या बैठकीला देशभरातील ११ राज्यांचे मुख्यमंत्री हजर झाले असून अनेक विरोधी पक्षांचे नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली आहे. राज्यातील महाविकास आघाडीने या बैठकीचं आयोजन केलं असून भाजपला शह देण्यासाठी आता विरोधकांनी रणशिंग फुंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT