Mamata-Banerjee e sakal
मुंबई

बंगाली दीदींची मराठीवर 'ममता'; YB चव्हाण सभागृहातील संवाद चर्चेत

ममता बॅनर्जी दुपारी तीन वाजता शरद पवारांची भेट घेणार आहेत.

ओमकार वाबळे

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra Tour) दौऱ्यावर आहेत. त्यांनी कालच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान, आज दुपारी तीन वाजता ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी उपस्थितांशी मराठीतून संवाद साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महाराष्ट्राती सर्व जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!" त्यांच्या या संवादानंतर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला. यावेळी सभागृहात जावेद अख्तर आणि स्वरा भास्कर उपस्थित होते.

ममता बॅनर्जी यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशीदेखील चर्चा केली. आज दुपारी तीन वाजता ममता बॅनर्जी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असून सर्वच राजकीय पक्षांचे या भेटीकडे लक्ष लागून राहिले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

ममता बॅनर्जी-शरद पवार भेट, राजकीयदृष्ट्या महत्वाची भेट

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर ममता बनर्जी (mamta banergee) तृणमुल कॉंग्रेसचा (Trinamool Congress) राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांसोबतची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

नवाब मलिकांनी दिली महत्वाची माहिती

2024 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहणार नाही, असा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांत दिला आहे. मात्र, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ममता दीदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्या पवारसाहेबांना भेटणार आहेत. बैठकीनंतर त्या पत्रकारांना संबोधित करून चर्चेची माहिती देतील.

हे तर अशक्य...

तृणमूल या क्षणी काँग्रेसला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत मलिकांना विचारले असता, तेव्हा त्यांनी सांगितलं की तृणमूल पश्चिम बंगालच्या बाहेर आपला पाया स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक पक्षाला हा अधिकार आहे. पण काँग्रेसला बाहेर ठेऊन भाजपच्या विरोधात एकसंध विरोधक उभारणे हे जवळपास अशक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT