ममता बॅनर्जी बुधवारी मुंबईत शरद पवारांच्या भेटीला  sakal
मुंबई

ममता बॅनर्जी ‘सिल्व्हर ओक’ वर दाखल

बैठकीसाठी सिल्व्हर ओक येथे अनेक राष्ट्रवादीचे नेतेदेखील उपस्थित आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra Tour) दौऱ्यावर असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी सिल्व्हर ओक येथे दाखल झाल्या आहेत. थोड्याचवेळात पवारांच्या घरी या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सिल्व्हर ओक येथे अनेक राष्ट्रवादीचे नेतेदेखील उपस्थित असून यामध्ये धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, रामराजे नाईक आदी नेते मंडळी दाखल झाल्याचे पाहण्या मिळत आहे.

ममता बॅनर्जी यांनी कालच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात बैठकीला सुरुवात झाली असून यामध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

ममतांचा मराठीतून संवाद

शरद पवार यांच्या भेटीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी उपस्थितांशी मराठीतून संवाद साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महाराष्ट्राती सर्व जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!" त्यांच्या या संवादानंतर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला. यावेळी सभागृहात जावेद अख्तर आणि स्वरा भास्कर उपस्थित होते.

ममता बॅनर्जी-शरद पवार भेट, राजकीयदृष्ट्या महत्वाची भेट

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर ममता बनर्जी (mamta banergee) तृणमुल कॉंग्रेसचा (Trinamool Congress) राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांसोबतची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT