मुंबई

मनीषा म्हैसकर यांनी स्विकारला पर्यावरण विभागाचा पदभार

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून मनीषा म्हैसकर यांनी आज पदभार स्वीकारला.  मनीषा म्हैसकर या 1992 साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विविध विभागात कामकाज केले असून राज्याच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणुनही आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम करत असताना गेल्या पाच वर्षात म्हैसकर यांनी महत्वाचे निर्णय घेतले. म्हैसकर यांचा मुंबई महापालिकेत साडेचार वर्षे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई शहरातील  कोव्हिड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येवर  नियंत्रण मिळविण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्समध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मनीषा म्हैसकर यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून सुत्रे हातात घेतल्यानंतर पर्यावरण रक्षणात शासकिय उपाययोजना, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्यांच्या सहभागासह कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले आहे.

--------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT