manoj jarange mumbai maratha reservation protest vashi resident traffic jam issue
manoj jarange mumbai maratha reservation protest vashi resident traffic jam issue  esakal
मुंबई

Maratha Reservation : मराठा आरक्षण सभेने वाशीकरांची कोंडी

सकाळ वृत्तसेवा

तुर्भे : मराठा आरक्षण मिळावे यासाठी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे- पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे कामा निमित्त गाडी घेऊन घराबाहेर पडलेल्या वाशीतील रहिवाशांचे पुरते हाल झाले.

वाशी सेक्टर 1 ते 16 पर्यंतच्या रस्त्यावर सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चक्का जाम झाला होता. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असताना पूर्वनियोजित माथाडी भवन येथील सभा अचानक रद्द करत ती छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे घेण्याच्या निर्णय झाला.

त्यामुळे सर्व मोर्चेकरी एपीएमसी मार्केटमधून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे रवाना होऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुंबईकडे कूच करण्याचा सगळ्यांना संदेश होता; मात्र बराच वेळ सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यात गेल्याने मोर्चेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसताना मांडले.

एन एम एम टी, बेस्ट यांचे वाहतूक नियंत्रक, वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई पोलीस यांचा योग्य समन्वय झाला नाही. सानपाडा पामबीच, एमजीएम हॉस्पिटल, पामबीचवर गाडीतच झोपून मोर्चेकरी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येताना थेट मोराज चौक येथून अरेंजा चौकामध्ये येऊ लागले.

परिणामी सकाळी महात्मा फुले ते अरेंज्या चौक या मार्गावर वाशी स्टेशनहून कोपरखैरणाला वळवलेल्या बसेस एक ते दोन तास अडकून पडल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नियंत्रण कक्षातून बस चालकांना वेळीच सूचना न दिल्याने ही परिस्थिती वोढवली. अनेक खाजगी गाड्या देखील अडकून पडल्या होत्या.

सकाळी 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ही परिस्थिती होती; मात्र वरील यंत्रणांच्या वेळीच संवाद झाला असता, तर ही परिस्थिती ओढवली नसती अशी प्रतिक्रिया प्रवाशी विकास पाटील यांनी व्यक्त केली. कोपरखैरणे वाशी स्टेशनला जाणाऱ्या बसेस ही काही प्रमाणात वाशी मध्ये अडकून पडल्या होत्या.

दरम्यान एपीएमसीतून मोर्चेकरी वाशीच्या दिशेने निघाल्यावर कोपरखैरणे येथून वाशी रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी वाशी गावातून जावे लागले. तसेच सीबीडी येथून कोपरखैरणेला जाण्यासाठी माथाडी भवन मार्गे गाड्या सोडण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT