मुंबई

मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटला कुणाला भेटायला गेलेले, महत्त्वाची माहिती आता आली समोर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : परवा रात्री ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे यांनी बोलावलं आहे म्हणून घरातून निघालेत आणि पुन्हा घरी पोहोचलेच नाहीत. मनसुख हिरेन हे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्यांसह जी स्कॉर्पियो गाडी आढळून आली त्याचे मालक असल्याचं बोललं जातंय. अँटिलीया स्फोटके प्रकरणातील प्रमुख दुवा म्हणून मनसुख हिरेन यांच्याकडे पाहिलं जात होतं. दरम्यान काल मनसुख यांचा मृतदेह रेतीबंदर खाडीत आढळल्यानंतर विधानसभेत विरोधकांनी प्रश्नाची सरबत्ती लावली आणि तपास NIA म्हणजेच केंद्रीय तपास यंत्रणांकडे सुपूर्त करावा अशी मागणी केली. यावेळी महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सातत्याने एक प्रश्न लावून धरला. तो म्हणजे मनसुख हिरेन हे क्रॉफर्ड मार्केटमध्ये कुणाला भेटण्यास गेले होते? 

पवन मनसुख यांचे व्यावसायिक मित्र आहेत

दरम्यान, याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर येतेय. मनसुख यांना भेटलेली व्यक्ती पवन ओस्तवाल असल्याचं बोललं जातंय. 17 फेब्रुवारीला विक्रोळी येथे गाडी सोडून मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केट येथे एका व्यक्तीला भेटले. त्या व्यक्तीचे नाव पवन ओस्तवाल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मनसुख यांनी दिलेल्या जबाबात तस नमूद केले आहे. ते त्यांचे व्यावसायिक मित्र आहेत. त्यांच्याच कारमधून मनसुख पुन्हा ठाण्यात आल्याचेही त्यांच्या जबाबात म्हटले आहे.  

माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत

दरम्यान याबाबत आता सखोल चौकशीची मागणी मनसुख यांच्या पत्नी यांनी केली आहे. माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कांदिवली गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी तावडे यांचा फोन आला असून त्यांनी घोडबंदर रोड येथे भेटायला बोलावले आहे, असे सांगून मनसुख हे घरून निघाल्याचे मनसुख यांच्या पत्नीने सांगितले. 

mansukh hiren death case mansukh met pawan otswal at crawford market

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT