मुंबई

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : शिवसेना खासदार संजय राऊतांनी मांडलेले 11 महत्त्वाचे मुद्दे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर भाष्य केलं. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास केला जावा असं संजय राऊत यांनी म्हटलंय. या प्रकरणाबाबत सत्य जितक्या लवकर गृह खातं समोर आणेल तितकं या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेची योग्य ठरेल असेही संजय राऊत म्हणालेत.  

काय म्हणालेत शिवसेना खासदार संजय राऊत : 

  1. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याबाबत तपास व्हायलाच हवा 
  2. जर उपस्थित प्रश्न योग्य असतील, मुद्देसूद असतील, त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच द्यावी आणि त्यावरही तपास व्हायला हवा 
  3. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबत देखील नागरिकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे 
  4. कुणीही त्यांच्या मृत्यूचं भांडवल करू नये 
  5. ती एक निरपराध व्यक्ती आहे. त्यांचा बळी कोणत्या कारणामुळे गेला, हत्या असो किंवा आत्महत्या असो, बळी कोणत्या कारणामुळे गेला, या सगळ्याबाबतचे सत्य जितक्या लवकर गृह खातं समोर आणेल तितकं या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेची योग्य ठरेल 
  6. विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना एका महत्त्वाच्या गुन्ह्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीचा किंवा साक्षीदाराचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे.
  7. विरोधी पक्षाने तपास पूर्ण होईपर्यंत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही. 
  8. त्याच्या कुटुंबाचा आक्रोश मलाही व्यथित करणारी गोष्ट आहे. 
  9. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सगळ्यांना मनसुख हिरेन यांचा मृत्यू व्यथित करणारा आहे. त्यामुळे हे नक्की काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे. 
  10. विरोधकांकडून केंद्रीय तपास यंत्राणाकडे तपस देण्याची मागणी केलीये म्हणजे त्यातून सत्य बाहेर येईल असं नाही. मुंबई पोलिस याप्रकरणी तपास करण्यासाठी सक्षम 
  11. गृहमंत्री अनिल देहमुक यांनी हा तपास ATS  कडे दिला आहे आणि त्यातील सर्व अधिकारी अशाप्रकारचा तपास उत्तमउत्तमरीत्या करण्यासाठी नावाजलेले आहेत. 

दरम्यान आता मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सरकार कसा तपस करताय आणि त्यातून कोणत्या गोष्टी समोर येतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT