मुंबई

मराठा आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकारचा अट्टाहास कशासाठी? दरेकरांचा हल्लाबोल

सुमित बागुल

मुंबई : आज मुंबईत वेगवेगळ्या २० ठिकाणी मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येतंय. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने सरकारने काहीही करावा पण मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवून राज्यातील मराठा आरक्षण अबाधित ठेवावं अशी मागणी केलीये.

दरम्यान, आज मुंबईत होणारं आंदोलन सरकारकडून चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचं मत भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय. याबाबत प्रवीण दरेकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केलाय. आज मुंबईत होणारं मराठा आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा अट्टाहास असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. मुंबईत रस्त्या रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय. यावरून दरेकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या : 

सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर केंद्राने आणि राज्याने काहीही करावं मात्र मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे.  

काय म्हणालेत प्रवीण दरेकर ?

मुंबईत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार पुरस्कृत दहशत फिरताना दिसतेय. हे मराठा आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारचा अट्टाहास कशासाठी? एवढाच अट्टाहास जर कोरोना निर्मूलनासाठी केला असता, तर कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो असतो. मराठा समाजाला विश्वासात घेऊन न्याय द्या. अशा प्रकारच्या दबावाला, तुमच्या जुलुमी प्रेशरला मराठा समाज घाबरणार नाही. त्यातून येत्या काळात असंतोष किंवा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. मराठा समाजाला आपल्याला दबावात टाकता येणार नाही, मराठा आंदोलन चिरडता येणार नाही, असं प्रवीण दरेकर म्हणालेत. 

pravin darekar on maratha agitation governments is crushing the agitation says opposition leader

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT