Maratha in mumbai  Esakal
मुंबई

Maratha Reservation: मुंबई आणि परिसरामध्ये मराठा समाजाची राजकीय ताकद किती ?

Why are Maratha's protesting for Reservation?

Chinmay Jagtap

Maratha Reservation:

महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणजे मराठा समाज. इतिहासात शेतकरी आणि योद्धे म्हणून मराठ्यांना ओळखले जायचे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 30% मराठा समाज असल्याचा अंदाज आहे. यामुळे मराठा समाज महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा समाज आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची चर्चा सुरू आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा समाज असल्यामुळे मराठा आरक्षण हे विरोधकांसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न बनून राहिला आहे.

मात्र महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आणि आजूबाजूच्या ठाणे आणि नवी मुंबई परिसरामध्ये नक्की मराठा समाजाची ताकद किती? असा प्रश्न कित्येकांना पडला आहे. याचं प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जेष्ठ राजकीय विश्लेक्षक  असलेल्या मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी केलेली ही चर्चा.

मुंबईच्या एकंदरीत राजकारणाचा इतिहास पाहिला तर मराठी अस्मितेवर बोट ठेवणारे पक्ष नेहमीच मुंबईमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मराठीचा मुद्दा घेऊन मोठे झालेले शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष यात आपण प्रामुख्याने पाहू शकतो. येत्या काळातही मुबंईत मराठी विरुद्ध अमराठी हीच लढत पाहायला मिळेल. असे मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, मुंबईमध्ये एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यापैकी ८ ते १० मतदारसंघात ६० ते ८० हजार मराठ्यांची मत आहेत तर तीन ते चार मतदारसंघात लाखापेक्षा जास्त मतं आहेत. तर इतर ठिकाणी मराठा समाजाचा विचार केला तर पाच ते सहा मतदार संघात मराठा समाजाचा काही प्रमाणात प्रभाव आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. मात्र मुंबईत पाहायला गेलो तर गिरणी कामगारांचा भाग सोडला तर मराठा समाजाचं इतकं प्राबल्य नसल्याचेच पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे ठाणे पट्ट्यामध्ये म्हणजेच ठाणे जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे दहा ते बारा टक्के मतदान आहे. तर नवी मुंबईमध्येही मराठा समाजाचा प्रभाव आहे. ज्यात माथाडी कामगारांची संख्या भरपूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

Parbhani News: ही तर दिवसाढवळ्या परभणीकरांची लूटच!; टॅंकर माफियांकडून नागरिक वेठीस; हजार लिटरसाठी घेताहेत ५०० रुपये

SCROLL FOR NEXT