Online fraud 
मुंबई

ऑनलाइन दारु मागवणं ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला पडलं महागात

सकाळ डिजिटल टीम

ऑनलाईन दारू मागविणे मराठी चित्रपट सृष्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्रीला महागात पडले.

ऑनलाईन दारू मागविणे मराठी चित्रपट सृष्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्रीला महागात पडले. मोबाईलवर आलेला ओटीपीची माहिती घेऊन सायबर भामट्यांना त्यांना सुमारे तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी फसवणुक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार महिला दादर परिसरातील रहिवासी आहे. त्यांचे एका खासगी बँकेत बचत खाते असून त्यांच्याकडे याच बँकेचे डेबीट आणि क्रेडिट कार्ड आहे. १९ नोव्हेंबरला रात्री सव्वादहा वाजता त्या त्यांच्या घरी होत्या. त्यावेळी बहिणीच्या मुलाच्या लग्नाच्या पार्टीसाठी त्यांना व्हीस्कीची बाटली भेट द्यायची होती. याबाबत त्यांनी गुगलवर वाईन शॉपचा क्रमांक शोधत असताना तिथे त्यांना दोन मोबाईल क्रमांक सापडले. या मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी व्हिस्कीची मागवली होती. यावेळी संबंधित व्यक्तीने त्यांना ४८०० रुपये गुगल पेद्वारे देण्यास सांगितले.

रक्कम भरल्यानंतर व्हिस्की घरपोच दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी दूरध्वनी केलेल्या क्रमांकावर रक्कम पाठवली. आँर्डर देऊनही व्हिस्की घरपोच न आल्याने अभिनेत्रीने मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी समोरील व्यक्तीने मोबाइलवर आलेला ओटीपी विचारला. हा ओटीपी सांगताच, त्या अभिनेत्रीच्या खात्यातून पाच व्यवहार झाले आणि त्यातून १ लाख २३ हजार ७८० रुपये इतर खात्यात वळवण्यात आले.

क्रेडिट कार्डची ओपीटी क्रमांक घेऊन त्याद्वारे त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन १ लाख ८१ हजार ७६४ रुपये ऑनलाईन व्यवहारसुद्धा करण्यात आले. अशा प्रकारे त्याने त्यांच्या डेबीट आणि क्रेडिट कार्डचे ओटीपी क्रमांक प्राप्त करुन सुमारे तीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT