Aditya-thakare
Aditya-thakare 
मुंबई

कल्याणमध्ये आदीत्य ठाकरेंनी घेतली शाळा

रविंद्र खरात

कल्याण : शिक्षणप्रणालीत बदल करून विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेना मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून टॅब, ऑनलाइन व आता शिवसेनेने शिवसेना टॉपर स्कोरर (scorer)  ही वेबसाईट सुरू केली असून त्या वेबसाईटमार्फत कसा अभ्यास करायचा याची माहिती कल्याण पूर्व मधील मॉडेल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना कोणी शिक्षकांनी नव्हे, तर युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी दिली. यावेळी आदीत्य ठाकरे यांनी हजारो विद्यार्थी वर्गाशी दिलखुलास संवाद साधला यामुळे आदीत्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांची घेतलेली शाळा विषय चर्चेचा विषय ठरली.

राज्यातील विद्यार्थी वर्गावर शिक्षणाचा बोझा होत असून त्यात बदल करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विविध प्रयोग केले जात आहेत. टॅब, ऑनलाइन आणि आता वेबसाईट सुरू केली असून आज सोमवारी (ता. 4) कल्याण पूर्व मधील मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये शिवसेना 'टॉप स्कोरर' या वेबसाईटबाबत युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना युवा सेनाप्रमुख आदीत्य ठाकरे म्हणाले की, मागील अनेक वर्षे शिक्षणप्रणालीमध्ये बदल करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहेत. टॅब, मुंबई मनपा शाळेत डिजिटल, ठाणे मध्ये ऑनलाइन तर आता विद्यार्थी वर्गाचा वेळ खासगी क्लासेस मध्ये जात असून पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी आम्ही वेबसाईट सुरू केली असून त्याचा पासवर्ड शिवसेना शाखेत उपलब्ध असून ही वेबसाईट फ्री आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करता येणार आहे. शाळा सुटल्यानंतर बहुतांश विद्यार्थी वर्गाचा वेळ खासगी क्लासेस मध्ये जातो, मग विद्यार्थ्यांनी खेळायचे कसे? असा सवाल आदीत्य ठाकरे यांनी केला. यावर तोडगा म्हणून ही वेबसाईट सुरू केली असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा दावा आदीत्य ठाकरे यांनी केला.

विद्यापीठाच्या कारभाराची आम्ही पोल खोल करून ही त्यांच्या कारभारात बदल झाला नसून कारभार सांभाळणाऱ्यांना लाजाही वाटत नसल्याची टीका युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी केली. पुढे ते म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या कल्याण मध्ये उपकेंद्रास पालिकेने जागा दिली आहे, जर विद्यार्थ्यांसाठी त्या जागेचा उपयोग होत नसेल तर ती जागा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने परत घेऊन त्यात स्वतःचे कॉलेज सुरू करावे. अशा सूचना युवा सेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांनी कल्याण मधील शिवसेना पालिका पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

विद्यार्थी वर्गाचा वेळ पाहता शाळा आणि खासगी क्लासेस मध्ये सर्वात वेळ जातो, त्यांचा खेळायचा वेळ खासगी क्लासेस मध्ये जातो, विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या मर्जीनुसार आणि वेळेनुसार अभ्यास करता यावा यासाठी वेबसाईट सुरू केली असून त्याचा पासवर्ड शिवसेना शाखेत उपलब्ध असून ही वेबसाईट फ्री आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करता येणार आहे. शाळा सुटल्यानंतर बहुतांश विद्यार्थी वर्गाचा वेळ खासगी क्लासेस मध्ये जातो, मग विद्यार्थ्यांनी खेळायचे कसे? असा सवाल आदीत्य ठाकरे यांनी केला. यावर तोडगा म्हणून या वेबसाईट सुरू केली असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा दावा आदीत्य ठाकरे यांनी केला. 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही विद्यार्थ्यांना बेस्ट बसेस मधून प्रवासाबाबत वचन दिले होते. त्याची आम्ही पूर्तता केली असून येथील केडीएमटीच्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा येथील पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

कार्यक्रम संपल्यावर बाहेर निघताना विद्यार्थ्यांनी सेल्फी सेल्फी म्हणून आवाज केला तर काही विद्यार्थ्यांना जवळ बोलावून त्यांचा मोबाईल हातात घेऊन युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी सेल्फी काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT