File photo
File photo 
मुंबई

मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मोकाटच!

- सुनीता महामुणकर

मुंबई : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे झाली आहेत. त्यानंतरही या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असलेले पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचे म्होरके अजूनही मोकाट आहेत. दहशतवादी हाफिज सईदची सुटका झाल्यामुळे तर या गुन्हेगारांना शिक्षा होणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. 

सागरी मार्गाने मुंबईत घुसलेल्या लष्कर ए तोयबाच्या 10 अतिरेक्‍यांना पोलिस आणि लष्कराने कंठस्नान घातले, ही नक्कीच देशवासीयांसाठी गौरवास्पद बाब आहे; मात्र या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे आणि हल्ल्याच्या कटाचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानमध्ये बिनबोभाट फिरत आहेत, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावामुळे मुंबई हल्ल्याचा पाकिस्तानमधील मुख्य सूत्रधार हाफिजला नजरकैदेत ठेवल्याचे सांगितले जात होते; मात्र दोनच दिवसांपूर्वी सईदला नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश तेथील न्यायालयाने दिले. त्याच्या सुटकेमुळे दहशतवादी प्रवृत्तींचे मनोबल तर वाढले आहेच, पण भारतासाठीदेखील धोक्‍याचा इशारा आहे. 

मुंबई हल्ल्यातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी म्हणजे अबू जुंदाल. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये राहून तेथे अतिरेक्‍यांना भारताविरोधात चिथावणी देण्याचे आणि हत्यारांचे ट्रेनिंग देण्याचे काम त्याने केले होते. शिवाय हल्ल्याच्या वेळेस देशातील माध्यमांवर लक्ष ठेवून ताज, नरिमन हाऊस आदी ठिकाणी घुसलेल्या अतिरेक्‍यांना पोलिस आणि लष्कराची माहिती देण्याचे कामही जुंदाल करीत होता.

जुंदालविरोधातील खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. साक्षी-पुरावे नोंदवण्याचे काम सुरू आहे. ज्या अमेरिकन डेव्हिड हेडलीने मुंबईत हल्ल्यासाठी पाहणी केली होती, त्या हेडलीविरोधातदेखील न्यायालयीन कारवाई करता येणार नाही. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याने दिलेली साक्षच भारतासाठी पुरावा ठरणार आहे; मात्र हेडलीला शिक्षा करणे सरकारला शक्‍य होणार नाही. पाकिस्तानमधील अन्य काही वॉण्टेड आरोपींमध्ये अबू हमजा, कर्नल, झाकी उर रहमान, काफिया असे सुमारे 12 जण अजूनही पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत.

या आरोपींना पकडण्याचे आणि मुंबईत त्यांना आणून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी अद्याप आपली यंत्रणा सज्ज नाही. शिवाय हे सर्व अतिरेकी पाकिस्तानमध्ये मोकाट आहेत. ते अजूनही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहेत असे सांगण्यात येते. त्यामुळे भारतासाठी त्यांचा धोका प्रचंड वाढला आहे. भारताला सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या म्होरक्‍यांना जाळ्यात पकडणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT