File photo of Neeraj Vora
File photo of Neeraj Vora 
मुंबई

'फिर हेरा फेरी'चे दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन 

वृत्तसंस्था

मुंबई : गेले वर्षभर आजारी असलेले अभिनेते-दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. ह्रदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे गेले 13 महिने नीरज व्होरा कोमामध्ये होते. अंधेरीतील क्रिती केअर हॉस्पिटलमध्ये त्यांचे पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. 

ज्येष्ठ अभिनेते परेश रावळ यांनी ट्विटरवरून या बातमीस पुष्टी दिली. गेले काही महिने नीरज व्होरा निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी होते. काल रात्री त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

'सर्कस' या टीव्ही मालिकेपासून व्होरा यांनी लेखक म्हणून कारकिर्दीस सुरवात केली. 1995 मधील रामगोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' चित्रपटाद्वारे व्होरा यांनी लेखक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 'राजू बन गया जंटलमन', 'अकेले हम अकेले तुम', 'विरासत', 'मन', 'सत्या', 'दौड', 'पुकार' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता. 2015 मध्ये झळकलेला 'वेलकम बॅक' अभिनेता म्हणून त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. 

'हेरा फेरी' या गाजलेल्या चित्रपटाचे लेखन त्यांनी केले होते. त्यानंतर 'फिर हेरा फेरी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. 'हेरा फेरी 3' चित्रपटाची घोषणा व्होरा यांनी गेल्या वर्षी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT