representational image of Jammer
representational image of Jammer 
मुंबई

'टो' कारवाईवर जॅमरचा उपाय 

दीपक शेलार

ठाणे : वाहने उभी करण्यास मनाई असणाऱ्या वाहनांना स्वत:च 'जॅमर' लावत वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी शक्कल लढवली आहे. यामुळे 'टो' करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. कारवाई न झाल्याने दंडही आकारला जात नाही, अशा प्रकारे वाहतूक विभागाचा महसूल बुडवला जात असल्याचा प्रकार ठाणे शहरात सुरू झाला आहे. 

नागरीकरणासह वाहनांची संख्याही वाढत असल्याने ठाणे शहरातील वाहतूक नियमन बिघडत चालले आहे. पार्किंगसाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्याकडेला पदपथावर व 'नो पार्किंग' क्षेत्रात वाहने उभी केली जातात. हा प्रश्‍न भेडसावत असताना वाहतूक शाखेकडून वाहनांची 'उचलेगिरी' सुरूच असते. वाहतूक शाखा आणि ठाणे महापालिकेचे 'टो' करणारे कर्मचारी वाहने उचलून नेतात. 

कारवाईत चारचारकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना जागेवरच जॅमर लावले जातात. यात टोईंग केलेल्या दुचाकींना दोनशे रुपये अधिकचा शंभर रुपये दंड; तर जॅमर लावलेल्या चारचाकी वाहनांना तीनशे रुपयांच्या पटीत दंड आकाराला जातो. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे चालकांना मनस्ताप सोसावा लागतो, वेळही वाया जातो. त्यामुळे अनेक चारचाकी वाहनचालक 'नो पार्किंग'मध्ये वाहने उभी करून स्वतःच जॅमर लावतात.

अशा वाहनांकडे टोईंग करणारे कर्मचारी दुर्लक्ष करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते, तसेच वाहतूक शाखेचा दंडात्मक कारवाईतील महसूलही बुडवला जातो. ही क्‍लृप्ती ठाण्यातील अनेक कार शोरूम कंपन्यांकडूनही वापरली जात असून फ्लॉवर व्हेली परिसर आणि पाचपाखाडी भागातील पदपथ अडवून ठेवलेल्या वाहनांना अशा प्रकारचे जॅमर लावलेले दिसून येतात. 

परिसरात जॅमरची विक्री 
वाहतूक शाखेकडून वाहनांना जॅमर लावले जात असल्याने काही वाहनचालकांनी बाजारात अवघ्या हजार दीड हजारात मिळणारे जॅमर खरेदी केले आहेत. ठाण्यातील मखमली तलाव परिसरात अशा प्रकारे जॅमर विकत मिळतात, अशी माहिती काही वाहनचालकांनी दिली. 

बेकायदा उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरूच असते, काही दिवसांपूर्वी वागळे भागातून अशा प्रकारच्या जॅमरवर कारवाई केली होती. वाहतूक शाखेकडून वाहनांच्या पुढील चाकाला जॅमर लावले जातात. या जॅमरवर विशिष्ट प्रकारची निशाणी असते, याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 
- अमित काळे, वाहतूक उपायुक्त 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT