Ratan-Tata
Ratan-Tata 
मुंबई

रतन टाटा रमले मुलांच्या विश्वात

दिनेश चिलप मराठे

मुंबादेवी : वेळ संध्याकाळी 7 ची नजर फिरेल तिथे मुलेच मुले. अहो ही मुले कसली ही तर या पृथ्वी वरील नंदनवनातील रंगी बेरंगी फुलेच फुले, आज या छकुल्यांच्या सान्निध्यात आल्याने प्रत्यक्ष फुलांच्या नंदनवनात आल्यासारखे वाटतेय आणि मनाला एक अवर्णनीय आनंद होतोय. या मुलांचे लोभस आणि निरागस चेहरे पाहून यांच्यातच प्रत्यक्ष परमेश्वर दिसतोय. हे उद्गार आहेत ते मुलांच्या विश्वात काही आनंदाचे क्षण व्यतीत करीत आपल्या बालपणात रमलेल्या रतन टाटा यांचे. 
टाटांच्या आगमनाचे निमित्त होते ते जे.डी. भर्डा हायस्कूल च्या 60 व्या वर्धापनदिनाच्या आनंदोत्सवा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या 600 शालेय विद्यार्थ्यांना संबोधन करताना. शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 650 चौरस फुटांचे पोर्ट्रेट विद्यार्थ्यांनी साकारले होते. तसेच माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त या शाळेने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक चेतना निर्माण होण्यासाठी 24 तास सतत वाचन  करण्याचा उपक्रम राबविला होता. या गोष्टींचेही टाटांनी कौतुक केले. 

छोटे विद्यार्थी नूरुद्दीन खान आणि वैष्णवी कोंडरे यांच्या कडून त्यांनी स्वागत भेट स्विकारीत त्यांना शुभेच्छा दिल्या. हायस्कूलचे चेअरपर्सन मक्की मसानी, स्टेनली डिसूझा, प्रशासक तहसीन खान यांनी लिम्का बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड 2017 ला नोंदविले गेल्याबद्दल आपल्या शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती स्लाइड शो मार्फत दाखविली. तहसीन खान यांनी सूत्रसंचालन करीत स्वागतपर भाषण केले. मुलांनी स्वागत गीते, नृत्य-गीते सादर करीत उपस्थित विद्यार्थी पालकांची मने जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT