Mumbai
Mumbai 
मुंबई

मुंबई मनपाच्या स्काउट गाईडच्या बालवीरांचे सुयश

दिनेश चिलप मराठे

मुंबई : मुंबई महानगरपालिका डोंगरी बी विभाग अंतर्गत येणाऱ्या डोंगरी महानगर पालिका शाळेतील स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील भोर येथे झालेल्या स्काउट गाईड राज्य पुरस्कार परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित करीत मुंबई महानगर पालिकेचे नाव देशभर उज्ज्वल केले आहे. लवकरच या मुलांचा गौरव राजभवन मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार आहे.

मुलांच्या या यशात सहभागी होत स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांचा सत्कार बी विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. उदयकुमार शिरूरकर यांनी केले. त्यांचे सहकारी सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महाराष्ट्र
राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट आणि गाईड या परिक्षेतील यशस्वी विद्यार्थी प्रताप झेंडे संकेत देशमुख, सुरज रकते, साई पाटील, अनिश नलावडे, साहिल कालेकर साक्षी शापूरकर, सोनाली खवास यांच्यासह स्काऊट मास्टर राहूल  ढोबळे सर यांचेही विशेष अभिनंदन सहाय्यक आयुक्त डॉ. उदयकुमार शिरुरकर यांनी केले.

डोंगरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी मुलांचे संदेश देते कौतुक केले. शाळेतील या छोटयाश्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, पसायदान,
सरस्वती वंदना आणि संविधान प्रतिज्ञा  वाचून करण्यात आली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.उदयकुमार शिरूरकर म्हणाले की, स्काऊट गाईडच्या याच हाँगकाँग वारी करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची दखल मुंबईतील सकाळ या आघाडीच्या प्रसिद्धी माध्यमांनी घेतली होती.

माध्यमांच्या विविध लोक कल्याणकारी बातम्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना एक आदर्शवत ठरत आहे. या सर्व मुलांनी आणि त्यातही दोन मुलींनी आपल्या चमकदार कामगिरिने यश पादाक्रांत केले आहे. भविष्यात चांगले आदर्श नागरिक व्हा! आणि महानगर पालिका सेवेत दाखल होऊन जनतेची प्रामाणिकपणे सेवा करा. शाळेचे मुख्याध्यापक धनगर सर, शिवकर सर, किरण सर, सवादकर मॅडम यांनीही मुलांचे शाबासकी देत कौतुक केले. स्काऊट गाईडचे राहुल ढोबळे यांनी महानगरपालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग आमच्या पाठीशी असल्याने आमची उमेद वाढली आहे. असे म्हणत महानगर पालिका शाळेतील मुले अन्य शाळांतील मुलांपेक्षा काकणभर सरस आहेत असे म्हणत पालिका शालांकडे पाठ फिरवू नका असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणअधिकारी महेश पालकर यांनीही मुलांचे कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT