Dombivali
Dombivali 
मुंबई

विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थापासून दूर राहणे गरजेचे - पो. आयुक्त रविंद्र वाडेकर

संजीत वायंगणकर

डोंबिवली : सशक्त व सुदृढ युवा पिढी हा देशाचा भक्कम आधारस्तंभ आहे. विविध व्यसनांच्या आहारी पाडून ही पिढी व पर्यायाने देशाचे भविष्य कमकुवत करण्यासाठी देशविघातक शक्तींचा जोर वाढत  आहेत. ही देशद्रोही पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहेत. मात्र तरूण पिढीने, विशेषतः विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ आणि इतर व्यसने यापासून दूर राहणे गरजेचे आहे असे आवाहन डोंबिवलीचे राष्ट्रपती पदक विजेते सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' आणि ध्रुव आयएएस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबीरात उपस्थित विद्यार्थ्यांशी वाडेकर यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले.

सोमवारी पेंढरकर सभागृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती पदक विजेते  रविंद्र वाडेकर यांना शहरमंत्री स्वरदा वैद्य हिच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन अभाविपकडून सन्मानित करण्यात आले. 1983 -84 च्या बॅचचे अधिकारी असलेले पोलिस अधिकारी वाडेकर हे महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, राज्य गुप्त वार्ता, वाहतूक शाखा असा दांडगा अनुभव आहे. अनेक कठिण गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे. या प्रसंगी बोलताना एसीपी वाडेकर यांनी अभाविपचे विविध सामाजिक उपक्रमांसाठी विशेष कौतुक केले. अभ्यासाबरोबार शरिर तंदुरुस्त ठेवणे, सामाजिक जाणिव असणे हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय समोर ठेवून ते पूर्ण करण्यासाठी खुप कष्ट करावेत असेही त्यांनी आवाहन केले. प्रशिक्षक अनिल घुगे यांनी पोलिस भरती प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक अभ्यास, मानसिक तयारी, फिजिकल फिटनेस याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

तत्पूर्वी ध्रुव अकॅडमीचे संचालक विनोद देशपांडे यांनी यूपीएससी आणि एमपीएससी परिक्षा, त्यांची तयारी कशी करायची, याबद्दल माहिती दिली. अभाविप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मिहिर देसाई याने अभाविपचे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सामाजिक कामाचा अनुभव घेण्यासाठी परिषदेशी जोडले जावे असे आवाहन केले. डोंबिवली आणि कल्याणमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT