Wada
Wada 
मुंबई

ठाणे जिल्ह्यातील वाड्यात चोरांचा धुमाकूळ

सकाळवृत्तसेवा

वाडा (ठाणे) : शहरातील शास्त्री नगर भागात असलेल्या श्री समर्थ सुपर मार्केट, आणि अन्य दोन घरांची कुलूपे तोडून किमती ऐवज व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडल्यामुळे वाड्यातील नागरिक व दुकानदार पुरते धास्तावले असून चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे व पोलिस प्रशासनाने शहरातील गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थ व दुकानदार करीत आहेत.

शास्त्री नगर भागातील समर्थ सुपर मार्केट मध्ये मध्यरात्री 3 वाजून 40 मिनीटाच्या सुमारास चोरांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील किमती सामान तसेच गल्ल्यामधील रोख रक्कम असा एकूण 70 ते 75 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली असून त्या फूटेज वरून पोलीस तपास करीत आहेत. तर त्याच भागात राहणारे जयराम पटारे आणि कमल आरज यांच्या घरातही कोणी नसल्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. पटारे यांच्या घरातून एक लाख पंचेचाळीस हजार किमतीचे दागिने व रोख रक्कम, आरज यांच्या घरातील टीव्ही व रोकड घेऊन चोरांनी पोबारा केला. या घटनेचा तपास वाडा पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. ए. सुबनावळ हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT