मुंबई

विस्थापितांचे गाळे पुन्हा प्रशासनाकडे

सकाळवृत्तसेवा

ठाणे  - प्रशासनाकडून आलेले प्रस्ताव सरसकट मंजूर न करण्याचे धोरण सध्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरू आहे. यापूर्वी पोलिसांच्या बुलेटचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने नामंजूर केला होता; तर आताच्या सर्वसाधारण सभेत रेंटल इमारतीतील व्यावसायिक गाळे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतच्या प्रस्तावातील त्रुटीला नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच हा प्रस्ताव पुन्हा प्रशासनाकडे पाठवून त्रुटी दूर करून पुढील सभेत आणण्याची मागणी केली आहे.

रेंटल इमारतींमधील व्यावसायिक गाळे ठाणे महापालिकेस हस्तांतरित करण्याबाबतचा आणि रस्तारुंदीकरणाने बाधित वाणिज्य धारकांचे या गाळ्यांमध्ये पुनर्वसन करण्याचे धोरण निश्‍चित करण्याचा प्रस्ताव मंगळवारी महासभेत मंजुरीसाठी आला होता; पण या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याची टीका करत नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. या प्रस्तावात बदल करून पुढील महासभेत तो मंजुरीसाठी आणावा, अशी सूचना या वेळी करण्यात आली. आधीच रस्तारुंदीकरणात या लोकांची जागा गेली आहे. अशा वेळी या जागामालकांना जागा पुन्हा देताना जर त्यांना भरमसाट भाडे बसवणार असेल, तर त्याला विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच लोकांचा या जागेवर असलेला मालकी हक्क जाऊन तो महापालिकेकडे जाणार असेल, तर या लोकांनी करायचं काय, असा प्रश्‍न अनेक नगरसेवकांनी केला. प्रशासनाच्या या प्रस्तावामुळे १९९७ पासून रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्यांनाही याचा फटका बसून त्यांचा मालकी हक्क संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्याऐवजी या प्रस्तावात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा सूचना सर्वपक्षीय सदस्यांनी केल्या आहेत. 

सुधारणा करण्याचे महापौरांचे आदेश
विशेष म्हणजे आधीच रस्तारुंदीकरणापायी झळ बसलेल्यांना भुईभाडे द्यावे लागणार असल्याने हा प्रस्ताव अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत, या प्रस्तावाला मंजुरी देणार नाही, असे नगरसेवकांनी या वेळी स्पष्ट केले. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सदस्यांनी केलेल्या सूचनांचा समावेश करून सुधारणा करून हा प्रस्ताव पुढील महासभेत मंजुरीसाठी आणावा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT