marriage done in just 80 thousand Neither DJ nor royal ceremony Copies of Constitution distributed mokhada
marriage done in just 80 thousand Neither DJ nor royal ceremony Copies of Constitution distributed mokhada sakal
मुंबई

ना DJ.. ना शाही सोहळा; संविधानाच्या प्रती वाटल्या; अवघ्या ८० हजारांत पार पडलं लग्न, या तरुणाचं होतंय कौतुक

भगवान खैरनार

मोखाडा - आदिवासी संस्कृती ही निसर्ग पूजक आहे. ही संस्कृती कायम टिकून रहावी तसेच त्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, म्हणून मोखाड्यातील कोचाळे गावातील मिलींद बदादे या शिक्षित तरूणाने आदिवासी पारंपारिक पद्धतीने विवाह केला आहे.

आदिवासींना आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी तसेच तरूण पिढीला संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून कायद्याच्या पुस्तकांचे वाटप करून अनोखा विवाह सोहळा साजरा केला आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये धरतीमाता, सुर्य, चंद्र, डोंगर, पशु, पक्षी आणि वृक्षाचे पूजन केले जाते.

या सर्व देवतांचे पूजन करून, लग्न करण्याची आदिवासी पारंपारिक संस्कृती आहे. मात्र, अलिकडच्या काळात काही मोजक्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. सद्यस्थितीत लग्न सोहळ्यात डिजे सर्रास दिसतो. हळद समारंभावरही मोठा खर्च केला जातो. डामडौलात आणि थाटात लग्न करण्याचा ट्रेंड आता आदिवासी भागातही दिसून येतो.

या ट्रेंडपासून दूर राहत अगदी साध्या पध्दतीने, आपली संस्कृती कायम टिकून रहावी म्हणून कोचाळे येथील शिक्षित आदिवासी तरूण मिलींद पांडुरंग बदादे व अस्मिता काशिनाथ गारे या वधु- वरांनी पृथ्वी, सुर्य, चंद्र, डोंगर, पशु, पक्षी यांच्या प्रतिकृतीचे आणि वृक्षाचे पूजन करून, तसेच क्रांतिकारक महापुरूषांच्या प्रतिमांना अभिवादन करून आपला विवाह सोहळा साजरा केला आहे.

आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी व क्रांतिकारक महापुरुषांचे विचार व त्यांची ओळख समाजाला व तरूण पिढीला व्हावी म्हणून आपण हा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा केल्याचे मिलिंद बदादे याने सांगितले.

समाजात जागृती व्हावी, तसेच समाज प्रबोधनासाठी आदिवासींचे संविधानीक अधिकार व पैसा ॲक्ट 1996 ह्या पुस्तकाच्या 300 प्रति लग्न सोहळ्यात वाटप करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी निसर्ग पुजक लग्न सोहळे झाले पाहिजेत अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे.

या लग्न सोहळ्यास आमदार सुनिल भुसारा, मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ, सरपंच हनुमंत फसाळे, जागले सर, उपसरपंच नंदकुमार वाघ, आनंद कामडी तसेच जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख, सर्जेराव भारमल, आदिवासी गायक शरद टीपे व बिरसा ब्रिगेड सह्याद्री म,राज्य व आदिवासी हक्क संघर्ष समिति व आदिवासी युवा फाउंडेशन पालघर, ठाणे, नाशिक येथील पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT