मुंबई

भिवंडीत इलेक्‍ट्रॉनिक गोदामाला भीषण आग 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील लोनाड ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या गोदामाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोदामामध्ये साठवण्यात आलेले लाखो रुपये किमतीचे इलेक्‍ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन ही आग पाच तासात आटोक्‍यात आणली. 

लोनाड गावाच्या हद्दीतील गोदामात टीव्हीएस कंपनीचे विविध इलेक्‍ट्रॉनिक साहित्य साठवून ठेवले होते. यामध्ये मोबाईल, टीव्ही, फ्रिज, एसी आदी साहित्यांचा समावेश होता.आज पहाटेच्या सुमारास अचानक या गोदामाला भीषण आग लागली. काही क्षणार्धात आगीने रौंद्ररूप धारण केल्याने भीषण आगीच्या धुराचे लोळ पाच किलोमीटरपर्यंत दूरवरून दिसत होते.

आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी 5 तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर याठिकाणी कुलिंगचे काम सुरू करण्यात आले. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नसून, आगीच्या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT