ratan.
ratan. 
मुंबई

मटकाकिंग रतन खत्रीचे निधन

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  कुख्यात मटकाकिंग रतन खत्री (वय 88) याचे शनिवारी मुंबईत निधन झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो आजारी होता. ज्यावेळी मुंबईत गँगवॉर शिगेला पोहोचला होता, त्यावेळी त्याने सर्वांशी संबंध प्रस्थापित करत मटका व्यवसायाचा जम बसवला होता.

मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहणारा रतन खत्री 1960 च्या दशकात आपले बस्तान बसवण्यासाठी तो कल्याण भगत यांच्याकडे काम करत होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मटका मुंबईत लोकप्रिय होता. त्यावेळी न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमधून कापसाचे दर उघडणे व बंद करणे यावर पैज लावली जात. 1964 मध्ये खत्री भगतपासून वेगळे झाला आणि त्याने स्वत: चा 'रतन मटका' सुरु केला. त्याचे नेटवर्क अगदी ठाण्यापर्यंत पसरले होते.

राज्य सरकारला समांतर व्यवस्था 
राज्य सरकारच्या लॉटरीप्रमाणे एक समांतर लॉटरी व्यवस्था त्यावेळी चालायची. कामगार वर्गापासून अगदी उच्चभ्रू लोकांनाही त्या काळात या मटक्याने वेड लावले होते. अनेकांचे संसार उद्वस्त झाले होते. त्या काळात प्रत्येक मटका किंगच्या मागे कोणा गँगस्टरचा वरहस्त असायचा. मात्र खत्रीने सर्वांशी सलोखाचे संबंध ठेवले होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईसाठी ऋतुराज-रहाणेकडून दमदार सुरुवात; पंजाबच्या गोलंदाजांचा विकेट्ससाठी संघर्ष

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT