माथेरान : विभागवार तपासणी करताना नगरपालिका स्वच्छता अधिकारी.
माथेरान : विभागवार तपासणी करताना नगरपालिका स्वच्छता अधिकारी. 
मुंबई

सावधान! कचरा कराल तर...

सकाळ वृत्तसेवा

माथेरान (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षण २०२० साठी माथेरान नगरपालिका सज्ज झाली असताना येथील काही दुकानदारांनी माधवजी पॉईंटजवळ कचऱ्याचा अक्षरशः उकिरडा बनवला होता. दुर्गंधीमुळे पर्यटकांना याचा खूप त्रास सहन करावा लागायचा. पण, नक्की कोणता दुकानदार कचरा टाकतो, हे माहीत नसल्याने कारवाई करता येत नव्हती. नगरपालिकेने यासाठी सीसी टीव्हीचा आधार घेत कचरा टाकणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणात माथेरानला जिल्ह्यात दुसरा आणि पाचवा, तर राज्यात २८ वा क्रमांक मिळाला होता. तेव्हापासून नगरपालिकेने प्रत्येकाच्या दारात कचरा संकलन करण्यासाठी ठेकेदार नेमून; तसेच दुकानातून कचरा संकलनासाठी घंटागाडी नेमली आहे. यासाठी नगरपालिका वर्षाला १ कोटी रुपये खर्च करते; पण काही दिवसांपासून माथेरानला बकाल बनवण्यास दुकानदारांनी सुरुवात केली होती. माधवजी पॉईंटजवळ कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. यामुळे पर्यटकांना त्यांचा त्रास होत होता. याबाबत नगरपालिकेत तक्रारीही केल्या होत्या; पण इथे कचरा नक्की कोण टाकतो, हे माहिती नव्हते. अखेर पालिकेने सीसी टीव्ही कॅमेरे बसवून जे दोषी आढळले, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. एकूण सात दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे बाकीच्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

माथेरान हे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते; पण स्वतःची मनमानी करणारे काही दुकानदार कचरा टाकत असतील, तर असे चालू देणार नाही. सर्व विभागात सीसी टीव्ही बसवले आहेत. एकूण ६७ कॅमेऱ्यांची नजर सर्वांवर राहणार असून, जो कचरा टाकताना दिसेल त्याच्यावर कारवाई करणार आहोत. यापूर्वी स्वच्छतेबाबत सर्व दुकानदार आणि नागरिकांना समज दिली होती.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT