माथेरान : शटल सेवा बंद आहे. त्यामुळे स्थानकात शुकशुकाट आहे.
माथेरान : शटल सेवा बंद आहे. त्यामुळे स्थानकात शुकशुकाट आहे.  
मुंबई

माथेरान शटल सेवा बंद

अजय कदम

माथेरान : पावसामुळे माथेरानमध्ये भूस्खलन झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा बंद केली आहे. पावसाळा संपल्यानंतर रेल्वे ट्रॅकची पाहणी करून पुढील निर्णय होणार आहे. 

शटल सेवेमुळे माथेरानमध्ये पर्यटकांची वर्दळ सुरू होती. आता ही सेवा बंद करण्यात आल्याने या गर्दीलासुद्धा ब्रेक लागणार आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, भाजप अध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजय सावंत, कॉंग्रेस शहराध्यक्ष मनोज खेडकर आणि माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी यांनी मध्य रेल्वेचे अधिकारी अशोक पवार यांची भेट घेऊन शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली. 

शटल सेवा बंद झाल्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे येथील व्यापारी आणि दुकानदार धास्तावले आहेत. 

माथेरानमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नेरळ-माथेरान ट्रॅकवर काही ठिकाणी दरड कोसळल्या आहेत; तर काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ही सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद केली नसून तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. 
- ए. के.सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 
 
अमन लॉज-माथेरान रेल्वे मार्ग सुरक्षित आहे. शटल सेवेच्या मार्गात कोणतेही भूस्खलन अथवा दरड पडण्याची घटना घडलेली नाही. तरीही मध्य रेल्वेने ही सेवा बंद केली, हा अन्याय आहे. 
- अजय सावंत, माजी नगराध्यक्ष 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

SCROLL FOR NEXT