Vaccination-1 
मुंबई

Coronavirus: लस टोचायला जाताना वैद्यकीय सर्टिफिकेट हवं का? जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई: लसीकरण मोहिमेता गती देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक विशेष निर्णय घेतला. आतापर्यंत ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत होती. मात्र आता 1 एप्रिलपासून सरसकट 45 वर्षांवरील व्यक्तींना लस टोचली जाणार असून केंद्र सरकारने या टप्प्यासाठी मान्यता दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या 45 वर्षांवरील व्यक्तींचा आकडा 45 लाखांच्यावर आहे. या सर्वांना लस टोचण्यासाठी लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे, ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणासाठी जाताना कोणत्याही वैद्यकीय सर्टिफिकेटची गरज नसेल असंही पालिकेने स्पष्ट केलं.

सुरूवातीच्या टप्प्यात केवळ कोरोना योद्ध्यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जात होती. त्यानंतर ६० वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील को-मॉर्बिलीटी असलेल्या व्यक्तींना लसीकरण केलं गेलं. त्यामुळे को-मॉर्बिलिटी असल्याचे वैद्यकीय सर्टिफिकेट सोबत घेऊन जाण्याची गरज होती. परंतु आता लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळावी यासाठी आता ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सरसकट लस टोचली जाणार आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तींना लसीकरणाला जाताना वैद्यकीय सर्टिफिकेट सोबत ठेवणं बंधनकारक नाही. तसेच, सध्याच्या घडीला रोज सरासरी 40 ते 45 हजार कोविड चाचण्या होत आहेत. ही संख्या लाखांपर्यंत वाढवण्याचे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सध्या मुंबईत 100 ठिकाणी लसीकरण होत असून संख्या वाढल्यास लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, असेही काकाणी यांनी सांगितले.

नव्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण दोन शिफ्टमध्ये केलं जाणार आहे. सेकंड शिफ्ट आणि काही खासगी रुग्णालयांचा लसीकरणात समावेश करुन घेतला जाणार आहे. जेणेकरुन जवळच्या केंद्रांवर जाऊन ते लस टोचून घेऊ शकतील. लसीचा साठा जेवढा लागत आहे तेवढ्याप्रमाणात तो उपलब्ध आहे. शिवाय, दर आठवड्याला नवीन साठा पालिकेला उपलब्ध होतो. सध्या अडीच लाख वायल्स पालिकेकडे उपलब्ध आहेत. शिवाय, 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या लसींचा साठा हा वेळोवेळी केंद्राकडे मागितला जाईल. त्यामुळे, लसीकरणासाठी लसींचा तुटवडा होईल असे सध्याचे चित्र नसून नागरिकांनी जास्तीत जास्ती लस टोचून घ्यावी असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.

दरम्यान, पालिकेने नागरिकांना पुर्व नोंदणी न करता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याच बरोबर नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘निवासी संकुला पर्यंत लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याचा महानगर पालिकेचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे, असे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT