राज्यपालांना मागणीचे निवेदन देताना शेतकरी. 
मुंबई

वनहक्कांसाठी आदिवासी राज्यपालांच्या दारात

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा ः जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्‍यातील बहुतांश आदिवासी कुटुंब ही वनहक्क जागेवर अवलंबून आहेत; मात्र वन विभागाने वनहक्क कायद्यान्वये जमीन कसणाऱ्या व वनहक्क दावेदारांवर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे. काही प्लॉट धारकांच्या शेतावरील घरांवर कारवाई करण्यात आली आहे. याविरोधात प्लॉट धारकांचे प्रश्‍न मार्गी लागावेत, म्हणून वनहक्क वयम चळवळीने राज्यपालांची भेट घेतली असून त्यांना याबाबतचे निवेदन दिले होते. त्याची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी (ता.4) पालघर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 

वन विभागाने वनहक्क जमीन कसणाऱ्या कुटुंबांना वनप्लॉट मोजून दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या वनहक्क जमिनीवर आदिवासी उदरनिर्वाह करत आहेत, असे असताना वन विभागाकडून अनेक बाबतीत अडचणी निर्माण केल्या जात आहेत. वन विभागाची अरेरावी थांबावी व आदिवासींच्या वनप्लॉट धारकांचे रक्षण व्हावे, म्हणून वयम चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर, वयमचे विश्‍वस्त मिलिंद थत्ते यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. तसेच या गंभीर प्रश्‍नाची राज्यपालांनी दखल घ्यावी, म्हणून त्यांना साकडे घातले होते. 

शेतकऱ्यांची भेट घेणार 
वनहक्क दाव्यांची समस्या मार्गी लागावी आणि वनप्लॉट धारक आणि वनविभाग यांमधील समस्या दूर व्हावी, यासाठी राज्यपाल मंगळवारी (ता.4) पालघर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते वाडा तालुक्‍यातील गालतरे येथील गोवर्धन ईकोव्हिलेजला भेट देणार आहेत. त्यानंतर विक्रमगडमधील डोयाचापाडा येथे आदिवासी वनप्लॉट धारक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे वयमंकडून सांगण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT