ncp
ncp 
मुंबई

युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी मेहबूब शेख

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसने नव्या व सामान्य चेहऱ्यांना संधी देण्याची सुरूवात केली आहे. आज युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्व मेहबुब शेख यांची निवड केली. तर प्रदेश कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे व सुरज चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. 

मेहबुब शेख यांच्यासह चव्हाण व वरपे हे सामान्य कुटूंबातील युवक आहेत. 
लोकसभा निवडणूकीच्या अगोदर तीन महिने युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. 

मेहबुब शेख हे उच्चशिक्षित असून उत्तम वक्ता आहेत. मुस्लिम समाजातील युवकाला युवक प्रदेशाध्यक्षपदाची पहिल्यांदाच जबाबदारी राष्ट्रवादीने दिली आहे. रविकांत वरपे हे सामान्य कामगाराच्या कुटूंबातील असून अभ्यासू व संघठन कौशल्य असलेलं युवा नेतृत्व मानले जाते. राज्यभरात त्यांचा मोठा युवासंपर्क आहे. वरपे यांनी सुरूवातीला काही काळ राष्ट्रवादीच्या मिडीया सेलचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते पुणे येथील आहेच. तर सुरज चव्हाण हे लातूर जिल्ह्यातील असून प्रदेश कार्यालयात ते समन्वयकाचे काम पाहतात. 
आगामी विधानसभा निवडणूकांत नव्या युवा चेहर्यांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे मोठे आव्हान या तीन्ही युवा नेत्यांसमोर राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT