मर्सिडीज 
मुंबई

भारतात एप्रिलमध्ये मर्सिडीजची इलेक्‍ट्रिक मोटार! 

बापू सावंत

मुंबई : "मर्सिडीज बेंझ इंडिया' कंपनी आपल्या नव्या ईक्‍यू ब्रॅण्डद्वारे येत्या एप्रिलमध्ये पूर्णतः विजेवर चालणाऱ्या गाड्या बाजारात दाखल करणार आहे. त्यामुळे एमजी-हेक्‍टर, टाटा या कंपन्यांसह मर्सिडीजही विद्युत मोटारींच्या विश्‍वात पदार्पण करणार आहे, असा दावा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मार्टिन श्‍वेनक यांनी केला आहे. मार्टिन यांनी मंगळवारी चाकणमधील कंपनीच्या वाहननिर्मिती प्रकल्पात हा विश्‍वास व्यक्त केला. 

चाकणमधील कंपनीच्या प्रकल्पाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचवेळी "मर्सिडीज बेंझ इंडिया'ने नव्या ईक्‍यू ब्रॅण्डचे अनावरण केले. याप्रसंगी श्‍वेनक यांनी ईक्‍यू ब्रॅण्डद्वारे कंपनी विजेवरील आरामदायी गाड्यांच्या निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. श्‍वेनक यांनी सांगितले की, मर्सिडीज येत्या एप्रिलमध्ये भारतात आपली पहिली संपूर्ण विजेवरील स्पोर्ट एसयूव्ही "ईक्‍यूसी' ब्रॅण्डची मोटार बाजारात दाखल करणार आहे. ईक्‍यू हा एक असा ब्रॅण्ड आहे की, ज्याद्वारे विद्युतीकरणाशी संबंधित सूत्रावर आधारित गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. त्यात ईक्‍यू बूस्ट, ईक्‍यू पॉवर व स्वतः ईक्‍यू अशा तीन प्रकारांतील गाड्यांद्वारे प्रदूषणविरहित विद्युत मोटारींच्या नवीन युगात (इलेक्‍ट्रो मोबिलिटी) आम्ही मोठी आघाडी घेऊ आणि या क्षेत्रात भक्कमपणे उभे राहू, असा विश्‍वास आहे. आमच्या ग्राहकांना वाटते की, अन्वेषण, अनुभव व आनंद घेण्याची हीच आताची वेळ आहे आणि त्यापासून प्रेरित झालेल्या "मर्सिडीज बेंझ'चा 2020 मध्ये "उज्ज्वल उद्यासाठी अथक काम' हा मंत्र असेल, असे श्‍वेनक यांनी ठामपणे सांगितले. 

जागतिक स्तरावर 10 मॉडेल्स 
जागतिक स्तरावर दोन-तीन वर्षांत विद्युत मोटारींची तब्बल 10 मॉडेल्स उपलब्ध केली जातील. भारतातील वातावरणाशी अनुकूल आणि भारतीय ग्राहकांना काय योग्य व हवे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे मार्टिन श्‍वेनक यांनी स्पष्ट केले. 

कंपनी उत्पादन सुविधांमध्ये टिकाऊ पुढाकार घेत आहे. या तिमाहीअखेरीस कंपनीची 45 टक्के ऊर्जा अक्षय संसाधनांमधून येईल. ज्यामुळे 4000 पेक्षा जास्त सौर पॅनेल बसविणे शक्‍य होईल. त्याद्वारे वर्षाकाठी सुमारे 1.6 मेगावॉट उत्पादन होऊ शकेल आणि वर्षाकाठी 2600 टन कार्बन डायऑक्‍साईड कमी होईल. 
- मार्टिन श्‍वेनक, 
व्यवस्थापकीय संचालक, मर्सिडीज बेंझ इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT