Mhada-Home
Mhada-Home 
मुंबई

‘म्हाडा’च्या सोडतीला उदंड प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) घरांच्या किमती कमी केल्यामुळे चारही मंडळांतील सोडतीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील एकूण ७,१०३ घरांसाठी एक लाख १७ हजार अर्ज आले आहेत. अनामत रक्कम भरून ५१ हजार ४५६ अर्जदार पात्र ठरले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांसाठीही सोडत काढली जाणार आहे.

‘म्हाडा’च्या सोडतीतील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांतील घरांच्या किमती पाच टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने गेल्या वर्षी घेतला होता. त्यामुळे सर्व कर आणि शुल्क वगळता या घरांच्या किमती अनुक्रमे ७५ आणि ५० टक्के कमी होतील. ‘म्हाडा’ची घरे महागडी असल्याच्या तक्रारी आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांतील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता, असे ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबईत ‘म्हाडा’च्या २१७ घरांची ‘मिनी लॉटरी’ दोन जूनला काढली जाणार असून, एकूण ६६ हजार ९१ अर्ज आले आहेत. पुण्यातील ४,७५६ घरांसाठी ४१ हजार ५०७ अर्ज आले असून, सात जूनला सोडत काढली जाईल. नाशिक येथे २,६१९ अर्जदार पात्र ठरलेल्या १,२१३ घरांसाठी २९ जूनला सोडत काढली जाणार आहे.

औरंगाबादमधील ९१७ घरांसाठी ७,३३७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून, चार जूनला सोडत निघणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT