मुंबई

नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्यांवर ‘मिस्वाक’

अरविंद पाटील

ऐरोली - दात-हिरड्यांच्या समस्यांसह मूत्रपिंडांचे आजार बरे करण्यासाठी ‘मिस्वाक’ औषधी वनस्पती फार महत्त्वाची मानली जाते. दुर्मिळ असलेली ‘मिस्वाक’ वनस्पती सध्या नवी मुंबईतील खाडीकिनारी दाटीवाटीने पसरलेल्या झुडपांत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. महत्त्वपूर्ण औषधी वनस्पती असूनही झुडपांत उगवणाऱ्या ‘मिस्वाक’कडे वन विभाग आणि महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी मुंबईच्या खाडीकिनाऱ्यांमध्ये वाढलेल्या दाट झुडपांमध्ये आत्तापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण औषधी वनस्पती आढळून आल्या आहेत. नैसर्गिकरीत्या इथे काही दुर्मिळ औषधी वनस्पतींची वाढ होते. अलीकडे थंडीच्या दिवसांत दाट झुडपांत या ठिकाणी मिस्वाक वनस्पतींची वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. वनस्पतीशास्रांत मिस्वाकला ‘साल्वाडोरा परसिका’, संस्कृत भाषेत ‘सार’ किंवा ‘अर्क’ आणि मराठीत ‘काखन’ म्हणून संबोधले जाते. ही वनस्पती ‘दातवणाचे झाड’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. खाडीकिनारी झुडपांत या वनस्पतीची वाढ होते. मिस्वाकला लाल, काळी आणि गडद पांढऱ्या रंगाची बोराच्या आकाराची फळेही येतात. ही फळे खाल्ली जात नाहीत. मात्र, मिस्वाकची वनस्पती अनेक आजारांसाठी उपयोगी पडते. दुर्मिळ औषधी वनस्पती असूनही तिच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत. या वनस्पतीचा सदुपयोग होण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

मिस्वाक दुर्मिळ औषधी वनस्पती आहे. या वनस्पतींच्या संरक्षणाचे प्रयत्न व्हायला पाहिजेत. 
- डॉ. रोहित मोरे, आयुर्वेदाचार्य 

मिस्वाक ही फक्त किनाऱ्यावर वाढणारी सहकांदळवन प्रजाती आहे. तिचे संरक्षण ही कांदळवन कक्षाची जबाबदारी आहेच. 
- प्रकाश चौधरी, परिक्षेत्र वन अधिकारी 

या आजारांसाठी उपयोगी
दात आणि हिरड्यांच्या आजारांवर ही वनस्पती गुणकारी मानली जाते. अनेक कंपन्या टूथपेस्ट बनवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. दात-हिरड्यांच्या समस्यांसह विषाणूजन्य आजार, पोटफुगी, मूत्रपिंडाचे आजार, सूज, संधिवात, वेदना मिटवण्यासाठीही या औषधीचा उपयोग केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT