मुंबई

महापुरामुळे मृत पावलेल्या अंभगराव कुटुंबियांना आमदार रमेश पाटील यांची आर्थिक मदत

सुजित गायकवाड

मुंबईः  पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हातील पंढरपुर येथील तिर्थ स्थानाच्या ठिकाणी पाण्याच्या प्रभाव वाढल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे चंद्रभागा नदीच्या कुंभारघाट बांधा कोसळून कोळी समाजातील एकाच कुंटुबातील ४ सदस्याचा दुदैवाने मृत्यू झाला होता. मृत झालेल्या कुटुंबियांची मंगळवारी २० ऑक्टोबरला पंढरपुर येथे आमदार रमेश पाटील यांनी सर्व पदाधिकारी यांच्यासोबत पिडीत कुटुंबाच्या घरी जाऊन अंभगराव कुटुंबाची भेट घेतली.  त्यामध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सदरचा अपघात त्यांचा झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 

सदरच्या घटनेने अंभगराव कुटुंबांनतर मोठा प्रसंग उद्भवला आहे. त्यावर त्यांचे लवकरच पुर्नवसन व्हावे म्हणून अंभगराव कुटुंबियांना पंतप्रधान आवास योजने अंर्तगत त्यांना घर मिळावे अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे आमदार रमेश पाटील यांनी स्पष्ट केले. 

अंभगराव कुटुंब हे कोळी समाजाचे असल्याने आमदार रमेश पाटील यांनी कोळी महासंघाच्या वतीनी त्यांच्या कुंटुबियांना एक लाख रूपयाची आर्थिक मदतीचा धनादेश देऊन त्यांची मदत केली. 

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या सोबत सरचिटणीस राजहंस टपके, उपनेते देवानंद भोईर, उपाध्यक्ष अरूणभाऊ कोळी, ज्येष्ठ
नेते साईनाथ भाऊ अंभगराव, उपनगरध्यक्ष अनिल अंभगराव, कर्मचारी अध्यक्ष रामभाऊ कोळी, सल्लागार डी. एम कोळी, सभाप विक्रम शिरसाठ आणि कोळी महासंघाचे पदाधिकारी विक्रांत माने, पांडुरग सांवतराव, गणेश अकुंश राव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

MLA Ramesh Patil provides financial assistance Ambhagrao family died due floods

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT