mla ravi rana  allegation mva govt and cm uddhav thackeray over arrest warrant
mla ravi rana allegation mva govt and cm uddhav thackeray over arrest warrant  e sakal
मुंबई

अटकेसाठी मविआचा पोलिसांवर दबाव; वॉरंट प्रकरणी रवी राणांचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अमरावतीचे आमदार रवी राणा यांना अटक करण्यासाठी अमरावती पोलिस अटक वॉरंट घेऊन राणांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहचले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान रवी राणा घरी नसल्याने पोलिस त्यांना अटक करू शकले नाहीत, यावर प्रतिक्रिया देताना राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार रवी राणा यांनी सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अमरावती पोलिस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरून अमरावती पोलिस त्यांच्या खार येथील घरी अटक वॉरंट घेऊन पोहचले होते असे सांगितले. राणा म्हणाले की, आज अमरावती पोलिस आयुक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणामध्ये अमरावतीमधून वॉरंट घेऊन खार मुंबई येथील राहत्या घरी मुंबई पोलिस आणि अमरावती पोलिस आले. तेथे मी नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत.

रवी राणा पुढे म्हणाले की, मी भाजपला मी मतदान करू नये यासाठी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांचा दबाव याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे, असे राणा यांनी सांगितले आहे. भाजपचे उमेदवार निवडून येतील यासाठी मी पुर्णपणे ताकद लावील आणि या दबावाला बळी पडणार नाही असे देखील रवी राणा म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT