Raj thackeray on PM Modi 
मुंबई

भाषणाची सुरुवात नेहरुंच्या नावाने केली अन् मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधान झाल्याचं राज ठाकरेंनी केलं जाहीर

Raj thackeray on PM Modi:राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणाची सुरुवात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावाने केली.

कार्तिक पुजारी

मुंबई- महायुतीची राज्यातील सांगता सभा आज शिवाजी पार्क येथे होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणाची सुरुवात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावाने केली.

पंडित जवाहरलाल नेहरु हे देशाचे तीनवेळा पंतप्रधान झाले होते. यांच्यानंतर आता देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी यांचे मी स्वागत करतो, असं म्हणत राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली. राज ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले.

बाबरी मशिद पाडल्यात आली. कारसेवकांना ठार मारण्यात आलं. शरयू नदीमध्ये कारसेवकांचे मृतदेह फेकण्यात आले. ते चित्र माझ्या डोळ्यासमोरुन गेलं नाही. मला वाटलं नव्हतं. राम मंदिर बनेल, पण मी मोदींना धन्यवाद देतो की ते होते म्हणून राम मंदिर बनलं. अन्यथा ते बनलं नसतं. स्वातंत्र्यापासून जम्मू-काश्मीरचा मुद्दा तसाच होता. पण, मोदींनी कलम ३७० हटवलं. आज खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर भारताचा भाग झाला आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

पोस्टाची ५० वर्षे जुनी सेवा बंद, रजिस्टर्ड पोस्ट ऐवजी आता स्पीड पोस्ट; खर्च वाढणार

'दादा, यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही'; २४ वर्षीय नवविवाहित प्राध्यापिकेनं चिठ्ठी लिहून संपवलं जीवन, पती-सासरकडून होत होता छळ

Latest Maharashtra News Updates Live : हत्तीण परत आणण्यासाठी सरकार सकारात्मक

लग्न न करताच बाबा होणार 'सैराट' फेम अभिनेता? गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो, आईचा विरोध होता म्हणून...

SCROLL FOR NEXT