
भारतीय डाकसेवेनं त्यांची ५० वर्षे जुनी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मोठी घोषणा पोस्ट ऑफिसकडून करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. भारतीय पोस्टाची रजिस्टर्ड पोस्ट ही सेवा बंद करण्यात येणार आहे. याऐवजी स्पीड पोस्टने ही सेवा देण्याचा विचार पोस्ट ऑफिस करत आहे.