Video Viral Sakal
मुंबई

"मर्द, खंजीर, मिंदे गट, खोके... मुलाखत संपली!" संदीप देशपांडेंकडून उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची नक्कल | Video Viral

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत संदीप देशपांडे तर संजय राऊत यांच्या भूमिकेत संतोष धुरी हे आहेत.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत स्वरूपातले पॉडकास्ट काल (मंगळवार ता.२५) सामना या वृत्तवाहिनीने प्रकाशित केले होते. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या मुलाखतीची नक्कल करून शिवसेना ठाकरे गटाला डिवचलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेत संतोष धुरी हे आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. आवाज कुणाचा या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली. तर या मुलाखतीचा मनसे व्हर्जन बनवत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या वाढदिवसासाठी हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, "मला घरी बसायला आवडतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री, मर्दाची औलाद, दिल्लीश्वर, अफजलखानाच्या फौजा, औरंगजेब, मास्क, सुरक्षित अंतर, कपटी, मशाला, कोरोना, गद्दार, मशाल, थोडंथोडं हिंदुत्व, मी संकटात असलो की मराठी माणूस, खंजीर, मिंदे गट, खोके.... मुलाखत संपली" असं बोलत देशपांडे यांनी ठाकरेंची नक्कल केली आहे.

ठाकरेंच्या ४० मिनीटांच्या मुलाखतीची नक्कल देशपांडे यांनी फक्त दोन मिनीटांच्या व्हिडिओमध्ये केली आहे. यामध्ये त्यांनी फक्त वेगवेगळ्या शब्दांचा वापर केला असून "हीच होती आजची स्फोटक मुलाखत" असं म्हणून संतोष धुरी यांनी सांगता केली आहे.

शिवसेनेच्या पॉडकास्टवर भाजपची टीका

"ही कसली मुलाखत, ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर. स्वत:चा पक्ष सरकार न सांभाळल्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची ही धडपड. भरलेला डालड्याच्या डब्बा उपयोगाला तरी येतो. रिकामा डबा टमरेल ठरतो." अशी खोचक टीका भाजपच्या आशिष शेलार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT