raj-uddhav.jpg 
मुंबई

इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत - मनसे

दीनानाथ परब

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोशल मीडियावरुन जनतेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी परिस्थिती सुधारली नाही, तर लॉकडाउन करण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाव न घेता त्यांच्या निर्णयांवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. आज मनसेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संबोधनावर टीका केली आहे. 

लॉकडाउन बद्ददल काय करावं असं काल मुख्यमंत्र्यांनी विचारलं. जनतेने उत्तर द्याव असं मुख्यमंत्री म्हणाले.  इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत. काल मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करणार असे सांगितले.  हे तज्ज्ञ कोण समजले नाही. त्यांचा आजचा कार्यक्रम पाहिला, तर ते जीम मालक, नाटय निर्माते आणि संपादकांना भेटणार आहेत. हे सगळे तज्ञ असतील, त्यांच्याशी चर्चा करणार असतील, तर तज्ज्ञ कोण याची परिभाषा समजली पाहिजे, असे देशपांडे म्हणाले. 

संदीप देशपांडे यांनी लेखातील एक संदर्भ वाचून दाखवला व  चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करावी. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करुन मार्ग काढावा, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली.  कोरोनाची आकडेवारी सांगितली जाते. कोरोनाची भीती लोकांच्या मनातून कमी झाली पाहिजे. कोरोना बरा होऊ शकतो हा विश्वास सरकारने निर्माण केला, तर परिस्थिती सुधारेल असे देशपांडे म्हणाले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: भाजप विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी सोपवणार? लवकरच मोठा निर्णय होणार; जाणून घ्या पडद्यामागच्या हालचाली

Mumbai News: चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

Hardik Pandya News : हार्दिकने 'Mumbai' सोडली! क्रिकेट करियर वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल; नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: ''सागर बंगल्यावर पोलिस पाठवले तेव्हा...'', ठाकरेंच्या फडणवीसांवरील भूमिकेवरुन एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI: प्लेइंग XI मध्ये वैभव सूर्यवंशी दिसणार? कोणाचा पत्ता कट होणार आकाश चोप्रांनी घेतलं थेट नाव! म्हणाला...

SCROLL FOR NEXT