raj.jpg 
मुंबई

अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, मनसेचं सूचक टि्वट

दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात आता सक्तीने दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात संतापाची भावना आहे. काल मुंबईच्या अनेक भागात व्यापारी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यापाऱ्यांना दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्या, असे म्हटले होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन करुन सहकार्य करण्याची विनंती केली होती. व्यापारी वर्गाची भावना लक्षात घेऊन, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सूचक टि्वट केले आहे. "अर्थ चक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल हे आम्ही आधीच सांगितलं होतं. दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने सुधारणा करावी अन्यथा..... " असे टि्वटमध्ये म्हटले आहे. 

"मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सरकारने त्या संदर्भात आखलेली नियमावली हे शब्दांचे खेळ करून एकाप्रकारे लाँकडाऊनच थोपवला आहे. सरकारने याबाबत विचार करायला हवा. व्यापाऱ्यांचे या पूर्वीच प्रचंड नुकसान झाले आहे.  हे असचं सुरू राहिलं तर जनता नक्की रस्त्यावर उतरेल. आज नागरिकांच्या भावनाही लक्षात घ्यायला हव्यात. त्यांनाही गरजेच्या वस्तू घेण्यासाठी दुकान आठवड्यातुन किमान काही दिवस उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी" असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ऐतिहासिक निर्णय! सातारा जिल्ह्यातील धोम धरणग्रस्त २९ गावांना मोठा दिलासा; पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी

२० वर्षांपूर्वीचे 'ते' पत्र अखेर सापडले, शिक्षकांच्या निवडश्रेणीचा मार्ग मोकळा, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

लोहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी; केतन अग्रवाल प्रकरणामुळे घटनास्थळ ठरतंय आकर्षण

रेल्वेत 'पहिले या, पहिले निवडा' तत्त्वावर नोकरी मिळणार! मुंबई ते सूरतदरम्यान 175 पदांची भरती होणार; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

SCROLL FOR NEXT