मुंबई : राज ठाकरे यांना राज्याची सत्ता दिल्यास मनसेचे नगरसेवक आमदारांना अमेरिकेतून ऑफर येईल, असं विधान मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते वसंत मोरे यांनी केला आहे. ठाण्यात मनसेच्यावतीनं उत्तर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे, यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना नागरिकांना उद्देशून ते बोलत होते. (MNS remembers when there are problems then why not during elections Question of Vasant More)
मोरे म्हणाले, "आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनसेचा नगरसेवक इतकं चांगलं काम करतो आणि त्यामुळं त्याला जर सर्व पक्षातून ऑफर येत असतील. तर राज ठाकरेंच्या हाती आपण राज्याची सत्ता दिली तर मला वाटतं अमेरिकेतून आपल्या नगरसेवक-आमदारांना फोन येतील. आपल्या लोकांना तिकडं बोलवून घेतील"
अडचणीच्या काळात मनसे आठवते निवडणुकीवेळी नाही
सर्वांनी पाहिलं असेल पुण्यात कोरोना काळ सुरु होता तेव्हा सरकारच्या माध्यमातील कामं व्हायला हवी होती ती काम झाली नाहीत. या काळात मनसेनं कामं केली. या काळात साईनाथ बाबर पाच-पाच हजार लोकांना रोज जेवण पुरवतं होते. आम्ही लोकांसाठी दवाखाने उघडे केले. खऱ्या अर्थानं या काळात मनसेनं काम केलं. कोरोनानंतर बँका आणि फायनान्सवाल्यांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली, अशा वेळेस त्यांच्यासाठी मनसेची दारं उघडी होती. लोकांचे पैसे अडकल्यावर मनसेवाले आठवतात पण निवडणुका लागतात आमचा विचार का होत नाही? असा सवालही यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केला. आपण एक याचा विचार केला पाहिजे की आपली कामं घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.