मुंबई

मुंबईत मनसेच्या भव्य मोर्चाला सुरूवात; बाळा नांदगावकर यांचा सरकारला इशारा

तुषार सोनवणे

मुंबई - वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर आज धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. आज मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सुरू झाला आहे. मोर्चाचे नेतृत्व बाळा नांदगावकर करीत आहेत. यावेळी त्यांनी मोर्चाला पोलिस सहकार्य करतील असा विश्वास दाखवला आहे.

वाढीव वीजबिलांच्या मुद्यावरून राज्यभर मनसे तर्फे आंदोलन केले जात आहे. मनसेचे सर्व नेते सोबत आहे. मुंबईतही आंदोलन सुरू झाले असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मनसैनिकांनी कूच सुरू केली आहे. सरकारचे आदेश काहीही असले तरी, पोलिस आम्हाला सहकार्य करणार असल्याचा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला. 

कोव्हिड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शक्य तेवढ्या खबरदारी घेऊन हा मोर्चा सुरू झाला आहे. मोर्चाचे नेतृत्व सर्वसामान्य जनातच करीत आहेत. मनसैनिक पोलिसांना सहकार्य करा. मोर्चा शांततेच पार पडावा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. राज्य सरकारला या मोर्चानंतरही जाग आली नाही तर त्यांना काय इशार द्यायचा हा निर्णय राज ठाकरे घेतील असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

MNSs grand march begins in Mumbai

--------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT