Palghar  sakal
मुंबई

Palghar : मोखाड्यात विहीरींनी गाठला तळ ; 21 गावपाड्यांना 9 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

" नेमेची येतो पावसाळा " या युक्ती प्रमाणे मोखाड्यात प्रतिवर्षी भिषण पाणी टंचाई ला येथील नागरीकांना सामोरे जावे लागते आहे. गतसालच्या तुलनेने यावर्षी एक महिना अगोदरच, डिसेंबर 2023 मध्ये मोखाड्यात पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे.

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : " नेमेची येतो पावसाळा " या युक्ती प्रमाणे मोखाड्यात प्रतिवर्षी भिषण पाणी टंचाई ला येथील नागरीकांना सामोरे जावे लागते आहे. गतसालच्या तुलनेने यावर्षी एक महिना अगोदरच, डिसेंबर  2023  मध्ये मोखाड्यात पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. ऊन्हाची तिव्रता वाढू लागल्याने, तालुक्यात टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढत आहे. सध्यस्धितीत तालुक्यात  21  गावपाड्यांना  9   टॅंकर द्वारे पाणीपुरवठा शासनाने सुरू केला आहे. त्यामुळे येथील नागरीकांना दिलासा मिळाला आह.         

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका प्रतिवर्षी भिषण पाणी टंचाई ने होरपळत आहे. टंचाई निवारण्याच्या शासन स्तरावरुन अनेक ऊपाययोजना आजवर करण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व योजना कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे मोखाड्यात पाणी टंचाई कायम राहीली आहे. टंचाई काळात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा हा ऐकमेव ऊपाय, शासनाकडून प्रतिवर्षी करण्यात येत आहे. 

 गतसालच्या तुलनेने यावर्षी एक महिना अगोदरच, डिसेंबर  2023  मध्ये पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. ऊन्हाची तिव्रता वाढू वाढु लागल्याने, टंचाई ग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढत आहे. सध्यस्धितीत तालुक्यात  21  गावपाड्यांना  9   टॅंकर द्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टंचाई ग्रस्त गाव पाड्यांतील सुमारे  10  हजारांहून अधिक नागरीक आणि जनावरांची तहान भागवली जात आहे. शासनाच्या धोरणानुसार माणसी  20  लिटर, लहान जनावरांना - 10, मोठी जनावरे - 35  तर शेळी, मेंढी आणि डुक्कर यांना  3  लिटर पाणी टॅंकरद्वारे पुरवठा करण्यात येतो आहे. 

 ऊन्हाची तिव्रता वाढल्याने मोखाड्यातील टंचाई ग्रस्त गाव पाड्यांतील विहीरींनी तळ गाठला आहे. गतसालच्या तुलनेने यावर्षी टंचाई ची तिव्रता अधिक असल्याची चुणूक, एक महिना अगोदर निर्माण झालेल्या पाणी टंचाई ने दाखवून दिली आहे. गतसाली  73  गावपाड्यांना  20  टॅंकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी ही तिव्रता वाढण्याची असुन टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाकडुन वर्तवली जात आहे.   

टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असलेली गावपाडे.......

गोळीचापाडा, धामोडी, स्वामीनगर, कुडवा, कुंडाचापाडा, तेलीऊंबरपाडा, वारलीवाडी, हट्टीपाडा, हेदवाडी, गवरचरीपाडा, ठवळपाडा, राजेवाडी, जांभुळवाडी, हुंड्याचीवाडी, धामणी, तुंगारवाडी, मडक्याचीमेट, कोलद्याचापाडा, चारणगांव, वाकीचापाडा, ठाकुरवाडी, गोमघर, वाशिंद, वाघवाडी आणि शेलमपाडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT