morbe dam sakal media
मुंबई

Morbe Dam News : मोरबे धरण ९४.५८ टक्के भरले

सकाळ डिजिटल टीम

Morbe Dam News : जुलै ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मोरबे धरणाने दिलासा देणारी पातळी गाठली आहे. नवी मुंबईकरांची तहान भागवणारे मोरबे धरण ८ सप्टेंबरपर्यत ९४.५८ टक्के भरले आहे.

पावसाने जून महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. १८ जुलैपर्यंत मोरबे धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे फक्त ४८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पावसाने हुलकावणी दिल्यास जल संकट निर्माण होण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, २० ते २६ जुलैपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या सहा दिवसांत तब्बल ८१ मीटरने पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारली. परंतु ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावत दिलासा दिला आहे. मोरबे धरण मागील वर्षी ८ सप्टेंबर रोजी ८५.८१ टक्के भरले होते. तर यंदा मोरबे धरणात ९४.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

पूर्ण भरण्याची शक्यता

शहरातील नागरिकांना धरणातून प्रतिदिन ४४० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणाची एकूण पातळी ८८ मीटर आहे. धरणाची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर असून ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत १८०.५५९ दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहचली आहे. सन २०२१ मध्ये मोरबे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस शंभर टक्के भरुन ओव्हर फ्लो झाले होते. यंदा धरणकाठ गाठला असून आणखी काही दिवस पावसाने हजेरी लावल्यास मोरबे १०० टक्के भरण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT