मुंबई

साडेपाच लाख मुलांचे गोवर-रुबेलापासून संरक्षण 

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - अपंगत्व, शारीरिक व्यंग यांसारख्या आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठीच्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला नवी मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरात अवघ्या तीन महिन्यांत सुमारे साडे पाच लाख मुलांना ही लस टोचण्यात आली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेने केंद्र आणि राज्य सरकारमार्फत संपूर्ण नवी मुंबईत 27 नोव्हेंबरला गोवर-रुबेला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरणाबाबत पालकांमधील असणारी शंका दूर करण्यासाठी पालिकेने जनजागृती केली होती. त्याचा चांगला परिणाम दिसला. 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात गोवर-रुबेला लसीकरण सिटी टास्क समितीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आरोग्य विभागाने शहरात 91 टक्‍क्‍यांपर्यंत लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आल्याची माहिती दिली. पुढील मोहिमेत हा आकडा 95 टक्‍क्‍यांच्याही वर नेण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांनी दिली. 

4 जानेवारीपर्यंतची आकडेवारी 
- शाळांचा सहभाग : 430 
- शाळेत लसीकरण : 2 लाख 48 हजार 394 
- शाळांव्यतिरिक्त लसीकरण : 3 लाख 16 हजार 785 

एका बाटलीत चार-पाच मुलांसाठी लस 
गोवर-रुबेला इंजेक्‍शनच्या एका बाटलीतून एका वेळेस चार ते पाच मुलांना लस टोचता येते. तेवढी मुले नसतील तर ती लस तासाभरात उडून जाते. त्यामुळे काही वेळा एकाच मुलाला पालक आरोग्य केंद्रात घेऊन आल्यास केंद्रांतर्फे पालकांचा संपर्क क्रमांक घेऊन त्याला नंतर लस देण्यासाठी बोलावण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT