रायगड जिल्ह्यातील  अनेक राेपे मृत झाली आहेत.
रायगड जिल्ह्यातील अनेक राेपे मृत झाली आहेत.  
मुंबई

रायगडात वृक्षलागवडीचा फज्जा 

प्रमाेद जाधव

अलिबाग : वनराईचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांसह सामाजिक संघटना, शाळा आदींनी गेल्या चार वर्षांत रायगड जिल्ह्यात सव्वा कोटीपेक्षा अधिक वृक्षलागवड केली होती; परंतु त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने या पैकी निम्म्यापेक्षा अधिक रोपे मृत झाली आहेत. त्यामुळे ही ठिकाणे ओसाड दिसत आहेत. "सकाळ'ने केलेल्या पाहणीत हे विदारक चित्र समोर आले आहे. 

युती सरकारने राज्यात 50 कोटी वृक्षलागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून 1 जुलै 2016 पासून वृक्षलागवड सुरू झाली. एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड केल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर रायगड जिल्ह्याला एक कोटी 31 लाख 54 हजार 762 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य दिले. हे उद्दिष्ट गाठताना जिल्ह्यात एक कोटी 24 लाख 64 हजार 348 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला आहे. 

वृक्षलागवडीच्या उपक्रमाला सामाजिक वनीकरण, वन विभाग, पोलिस, महसूल आदी विभागांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलिस आदींनीही त्याला मोलाची साथ दिली.
 
काही ठिकाणी तर मोठ्या थाटामाटात वृक्षलागवडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 
मात्र "सकाळ'ने केलेल्या पाहणीत अलिबाग, मुरुड, पोलादपूर, म्हसळा, माणगाव अशा अनेक तालुक्‍यांमधील या रोपांचे संगोपन करण्यास सरकारी यंत्रणा अयशस्वी ठरल्याचे दिसते. असंख्य रोपे मृत झाली आहेत. त्यामुळे रोपे लावलेला परिसर आता ओसाड झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी, वादळामुळे झाडे कोलमडून पडली आहेत. मात्र, सरकारी दाव्यानुसार 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रोपे सुस्थितीत आहेत. 

...म्हणून मोहीम फसली 
- मुसळधार पावसात अनेक रोपे वाहून गेली. 
- वृक्षलागवडीच्या ठिकाणी कुंपण व अन्य सुरक्षेच्या उपायांचा अभाव 
- वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याकडे दुर्लक्ष 
- काही ठिकाणी रोपांची लागवड न करता ती टाकून दिली. 

श्री सदस्यांचे काम कौतुकास्पद 
वृक्षलागवड अभियानात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सहभाग घेतला होता. या सदस्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा व अन्य डोंगराळ, सपाटीकरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर हा परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्षांना सतत पाणी घालणे, खताचा पुरवठा करणे अशी अनेक प्रकारची कामे करून वृक्षांचे संवर्धन करण्यात आले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT